शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (16:41 IST)

Cheque देताना चुकूनही या चुका करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते

सध्या बँकिंग फसवणुकीच्या घटना घडणे हे सामान्य झाले आहे.देशातील विविध ठिकाणाहून दररोज बँकिंगच्या फसवणुकीची प्रकरणे बाहेर येत आहे.ही बँकिंग फसवणूक थांबविण्यासाठी देशातील सर्व बँका वेळोवेळी ग्राहकांना सूचना देतात.या साठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे.अलीकडील काळात बँकिंग फसवणुकीत चेक किंवा धनादेश फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चेकमधून फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे प्रणाली सुरु केली आहे.
 
सर्व बँका ही पॉझिटिव्ह पे प्रणाली हळू हळू अवलंबवत आहे.आम्ही आज आपल्याला चेकमधून होणाऱ्या फसवणूकला टाळण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण आपलं नुकसान टाळू शकता.या साठी आपल्याला काही गोष्टींचे पालन कटाक्षाने करावे लागणार.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 रिक्त धनादेश वर सही करू नका- चेक वर ज्या व्यक्तीला चेक देत आहात,त्याचे नाव,रक्कम,आणि तारीख लिहा.रिकाम्या चेकवर कधीही सही करू नका.चेकवर लिहिण्यासाठी नेहमी पेनचा वापर करा.
 
2 धनादेश नेहमी क्रॉस करा-बँक चेकच्या सुरक्षितेसाठी नेहमी गरज पडल्यास चेक क्रॉस जारी करा.जेणे करून आपण त्याचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता.
 
3 जागा रिक्त सोडू नका -धनादेश देताना कधीही जागा रिकामी ठेवू नका.नेहमी जागा मोकळी असल्यास रेषा ओढून द्या.धनादेशावर कुठेही सही करू नका.चेक मध्ये काही बदल करायचे असल्यास व्हेरिफाय करण्यासाठीच त्या ठिकाणी सही करा.प्रयत्न हा करा की काही बदल करावा न लागो.
 
4 धनादेश रद्द करताना हे लक्षात असू द्या-चेक कॅन्सिल करताना नेहमी MICR बँड फाडून टाका.आणि संपूर्ण चेक वर कॅन्सिल CANCELअसे लिहा.
 
5 धनादेश ची डिटेल्स आपल्या कडे ठेवा- आपण एखाद्याला चेक दिल्यावर त्याची डिटेल्स आपल्याकडे नमूद करून ठेवा.आपली चेकबुक नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा.