शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (13:24 IST)

ATM Card Reissue Process: जर एटीएम कार्ड गहाळ झाले असेल तर ते पुन्हा बनवण्याची प्रक्रिया काय आहे, जाणून घ्या

एसबीआय,एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेसह देशातील सर्व मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना घरी बसून त्यांचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात.तसेच,आपण नवीन कार्डासाठी सहजपणे ऑनलाईन अर्ज करू शकता.
 
ATM Card Reissue Process:: आजच्या धकाधकीच्या जीवनात,ऑनलाइन बँकिंग ते व्यवहाराशी संबंधित सर्व कामासाठी एटीएम कार्डचे महत्त्व खूपच वाढले आहे.एटीएम कार्डसंदर्भात आपल्याला कोणती खबरदारी घ्यावयाची आहे,याची माहिती बॅंका वेळोवेळी देत असतात.
 
तरीही अनेक वेळा हे एटीएम कार्ड एकतर आपल्या कडून हरवले जाते किंवा कुठेतरी पडते.जर आपले हे हरवलेले एटीएम कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हातात पोहोचले, तर ते आपल्या खात्यातील रकमेसाठी धोकादायक ठरू शकते.    
आपले एटीएम कार्ड गहाळ झाल्यास आपल्याला घाबरण्याची गरज नाही. या प्रकरणात, बँक आपल्याला आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी एटीएम कार्ड ऑनलाइन ब्लॉक करण्याची सुविधा देते.एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेसह देशातील सर्व मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना घरी बसून त्यांचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात.एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना टप्या-टप्यात ही  माहिती दिली आहे की हरवलेले किंवा गहाळ झालेले डेबिट कार्ड पुन्हा कसे जारी करावे आणि कार्ड कसे ब्लॉक करावे. 
 
* सर्वप्रथम या स्टेप्स वापरून आपण एटीएम कार्ड ब्लॉक करा
 
1 जर आपण एसबीआय ग्राहक असाल आणि आपले  एटीएम कार्ड हरवले असेल तर सर्वप्रथम बँकेकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून 1800 112 211 आणि 1800 425 380 डायल करा.
 
2 एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी, 0 नंबर दाबा
 
3 यानंतर आपण 1 चा अंक दाबा आणि आपल्या ATM कार्डचे शेवटचे 5 अंक टाईप करा.आपल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी पुन्हा 1 दाबा
 
4 यामुळे आपले एटीएम कार्ड ब्लॉक होईल.ज्यांची माहिती आपल्या मोबाईल क्रमांकावर लगेच येईल.
 
* या सोप्या स्टेप्स वापरून नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज  करा-
 
1  आपण एसबीआय ग्राहक असाल तर सर्वप्रथम बँकेत नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 1800 112 211 आणि 1800 425 380 डायल करा.
 
2 आपले  जुने एटीएम कार्ड बदलण्यासाठी 1 अंक दाबा.
 
3 या नंतर आपले जन्म वर्ष (जन्मतारीख) टाईप करा.
 
4 आपल्या तपशीलांची पुष्टी करण्यासाठी 1 आणि रद्द करण्यासाठी 2 दाबा. यासह आपली नवीन कार्डासाठी ची विनंती नोंदवली जाईल. 
 
5 हे नवीन एटीएम कार्ड काही दिवसात बँकेत नोंदणीकृत केलेल्या आपल्या पत्त्यावर पोहोचेल.
 
टीप : एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठीही हीच प्रक्रिया अवलंबली जाईल. 
 
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक देखील अशा पद्धतीनेच आपले कार्ड ब्लॉक करू शकतात आणि त्यांच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर किंवा त्यांच्या इंटरनेट बँकिंग अकाउंटवर जाऊन नवीन कार्ड मिळवू शकतात.
 
सूचना -आम्ही सांगू इच्छितो की आपल्या या नवीन कार्डसाठी बँक आपल्या खात्यातून अतिरिक्त शुल्क आकारते. हे शुल्क सर्व बँकांसाठी वेगळे आहे.