1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (14:00 IST)

शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी निर्माण करणारी मध केंद्र योजना आहे तरी काय ?

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.
 
योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता :
1)   वैयक्तिक मधपाळ : या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते.
 
2)  वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) : या योजनेसाठी किमान 10 वी पास, वय वर्षे 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थींकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
 
योजनेची वैशिष्ट्ये :
या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.
 
अटी व शर्ती :
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील.  मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
 
 या योजनेच्या अधिक माहितीसाठी उस्मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (द्वारा – जिल्हा उद्योग केंद्र), प्रशासकीय इमारत समोर,  (दूरध्वनी क्रमांक : 02472- 222301)  उस्मानाबाद – 413501 ई-मेल आयडी : [email protected] येथे संपर्क साधवा तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला नं.5, महाबळेश्वर, जिल्हा- सातारा, पिन : 412806 (दुरध्वनी : 02168-260264) यांच्याशी संपर्क साधावा.