शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (14:51 IST)

Subhadra Yojana:काय आहे सुभद्रा योजना आणि महिलांना कसे मिळणार 50 हजार रुपये

राज्य सरकारे असोत किंवा केंद्र सरकार असोत, त्या दोन्ही योजनांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्या आधीपासून सुरू असलेल्या अनेक योजनांमध्ये बदल करत राहतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी अनेक नवीन योजनाही राबविल्या जातात. यामध्ये लोकांना आर्थिक मदत करण्यापासून इतर मार्गांनी मदत करण्यापर्यंतच्या अनेक योजनांचा समावेश आहे. याच क्रमाने, आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी आणखी एक योजना सुरू होणार आहे, तिचे नाव आहे 'सुभद्रा योजना'. अशा स्थितीत ही योजना काय आहे आणि त्याचा लाभ कोणाला आणि काय मिळणार जाणून घ्या.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी या निमित्त एका नवीन योजनेचा शुभारंभ केला असून त्याचे नाव सुभद्रा योजना आहे. या योजनेचा लाभ ओडिशातील महिलांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षातून दोनदा प्रत्येकी पाच हजार रुपये म्हणजे वर्षातुन 10 हजार रुपये मिळणार आहे. 
ही योजना 2024-25 ते 2028-29 या कालावधीत राबविली जाणार आहे. 
या योजनेत महिलांना पाच वर्षात एकूण 50 हजार रुपये मिळणार आहे. या योजनेत महिलांना डेबिट कार्ड दिले जाणार आहे.
पात्रता- 
21 ते 60 वर्षाच्या महिला या योजनेसाठी पात्र आहे. अर्जदारांनी ओडिसा राज्यातील मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
ज्या महिला सरकारी कर्मचारी किंवा करदात्या आहे. किंवा एखादी महिला जी पूर्वीपासून एखाद्या योजनेचा लाभ घेत आहे या योजनेसाठी पात्र नसणार 
 
अर्ज कसे कराल- 
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिला अंगणवाडीकेंद्र ब्लॉक ऑफिस, मो- सेवा केंद्र किंवा जनसेवा केंद्रातून अर्जासाठी फॉर्म घेऊ शकतात. 
नंतर अर्ज भरून संबंधित कागदपत्रे लावून सबमिट करायचा.नंतर लाभ मिळू शकेल.
Edited by - Priya Dixit