1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (11:36 IST)

Kick Day 2023 अँटी व्हॅलेंटाईन वीकचा किक डे दिवस का साजरा केला जातो

breakup heart
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानंतर आता लोक अँटी व्हॅलेंटाईन वीक साजरा करत आहेत. ज्याची सुरुवात 15 फेब्रुवारीला स्लॅप डेने झाली. यानंतर किक डे, परफ्यूम डे, फ्लर्ट डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि ब्रेकअप साजरे केले जातील. व्हॅलेंटाईन वीक हा प्रेमाने भरलेला असताना, अँटी व्हॅलेंटाईन वीक अगदी उलट आहे आणि कोणत्याही प्रकारे प्रेमाशी संबंधित नाही.
 
व्हॅलेंटाईन वीकमध्ये सर्वत्र कपल्स पाहायला मिळतात, त्यामुळे हा संपूर्ण आठवडा अविवाहित असलेल्यांना नक्की आवडत नाही. तसेच या प्रेमाच्या दिवसांचा उत्सव संपूर्ण 8 दिवस चालतो. हे 7 फेब्रुवारी रोजी रोज डे च्या दिवशी सुरू होते आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ला संपतो. व्हॅलेंटाईन वीक नंतर अँटी व्हॅलेंटाइन वीक ही साजरा केला जातो. अँटी व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजेच किक डे.
 
किक डे इतिहास आणि महत्त्व
नकारात्मक नातेसंबंधांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी किक डे मोठा पाऊल ठरतो. या दिवशी ते त्यांचे नाते संपवू शकतात. या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता काढून टाकू शकता जे तुमच्या एक्समुळे आहे.
 
तुम्ही जगातील सर्व आनंदासाठी पात्र आहात आणि तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून काहीही रोखू शकत नाही. तसेच किक डे वर नकारात्मक नातेसंबंधातून मिळालेल्या सर्व भेटवस्तू किंवा आठवणी देखील बाहेर काढल्या पाहिजेत.
 
किक डे हे मुख्यत: विषारी नातेसंबंध सोडल्यानंतर आपण धरलेल्या नकारात्मक भावनांना सोडून देण्याचे प्रतीक आहे. या दिवशी आपण वाईट सवयी, हरवलेला आत्मविश्वास आणि सर्व विषारी गोष्टींपासून सुटका मिळवू शकता ज्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यापासून रोखत आहेत0.
 
या दिवशी मजेसाठी मित्र एकमेकांना किक मारतात. जीवनातील वाईट गोष्टी काढून टाकून तुम्ही आनंदी आणि सकारात्मक राहू शकता हे या मागील उद्देश्य असावं.