रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Updated : गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (11:41 IST)

Kiss Day : व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक मध्ये आज म्हणजेच 13 फेब्रुवारीला किस डे (Kiss Day) साजरा केला जातो, साधारणतः शारीरिक स्पर्श हा प्रेमाच्या नात्यातील अंतिम टप्पा मानला जातो, स्वतःला एकमेकांच्या हाती सोपावून आपल्या प्रेमाची ग्वाही देण्याचा हा दिवस आहे. कधीकाळी चारचौघात बोलली सुद्धा न जाणारी ही गोष्ट कालानुरूप आता काही फार निषिद्ध उरलेली नाही. 
 
किसिंग भावनात्मक जुडाव असला तरी याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी अनेक फायदे आहेत. याने पचन क्रिया सुरळीत होऊन जीवन काळात वृद्धी होते. जाणून घ्या याचे फायदे:
 
कॅलरीज कमी करण्यासाठी
इतर शारीरिक क्रियाकलापांमुळे ज्या प्रकारे कॅलरीज कमी होतात त्याच प्रकारे लहान आणि रोमँटिक किस केल्याने 2 ते 3 कॅलरीज तर भावनिक किसने 5 हून अधिक कॅलरीज कमी होतात. किसची अवधी जितकं लांब आणि इमोशनल असेल तेवढंच कॅलरीज कमी होण्यात मदत मिळेल.
रिलॅक्स होण्यासाठी
किसिंगने शरीरात फील-गुड केम‍िकलचं संचार होतं. किसिंगने शरीरात ओक्सीटोसिन लेवल वाढतं जे एक नैसर्गिक आरामदायक केमिकल आहे. याने रिलॅक्स आणि आनंदाची अनुभूती होते.
 
हारमोंसचे आदान-प्रदान
किसिंगमध्ये पुरुषाचे हारमोंस महिलेच्या तोंडात स्थानांतरित होतात. ज्याने टेस्टोस्टेरोन सारख्या हारमोंसचा संचार होतो. अशात महिलेत उत्तेजना वाढते आणि परिणामस्वरूप सेक्सची संधी सापडते.
 
रोग प्रतिकारशक्ती
किसिंगने शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते. याने शरीर मजबूत होऊन आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.
वाद संपवण्यासाठी
एकमेकावर आरोप- प्रत्यारोप किंवा वाद झाल्यावर जर एक इमोशनल किस झालं तर सर्व वाद संपुष्टात येतं. किस करून लोकं आपसातील मनमुटाव दूर करण्याचा प्रयत्न करतात.
 
चेहर्‍यासाठी फायदेशीर
आम्ही शरीरातील इतर अंगांसाठी वेगवेगळे व्यायाम करू शकतो परंतू चेहर्‍याचे स्नायू मजबूत करण्यासाठी किस सर्वोत्तम व्यायाम आहे. किस करताना चेहर्‍याचे 30 स्नायूंचा व्यायाम होतो ज्याने गाल टाइट राहतात.