मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (09:15 IST)

आज तर काय म्हणे "किस"डे

kiss day
आज तर काय म्हणे "किस"डे,
"कोरोना"साहेब आलेकी आडे,
पंचाईतच झाली बिचाऱ्या प्रेमवीरांची,
नसती ब्याद लागायची मागे कोरोना ची,
नको रे बाबा काही कीस फीस,
दुरूनच देऊ ,आपण फ्लाईंग कीस,
नसते आले कोरोना चे वादळ जगात,
प्रेमवीरांची झाली असती चांदी,
"चुंबन दिवस"झाला असता जोमात!!
पाळा बाबांनो सारे नियम काटेकोर,
नाहीतर उगीचच करावं लागेल"वन टू का फोर"! 
अश्विनी थत्ते.