रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

बेभान तू वार्‍यासारखी...

valentine day poem
पाहता क्षणी तुझे ते डोळे
हरवून गेलो मी नकळतच
बेभान तू वार्‍यासारखी
मी आपला गोंधळलेलाच
 
सुरू झाला बघण्याच्या तो प्रवास
कधी चोरून कधी बिनधास्त
डोळ्यासमोर नाहीशी झाली मात्र
तर जीव कासावीस होतो क्षणात
 
तुझ्याही मनात हीच चाहूल असेल का
नको विचारू हा प्रश्न सांगतो मनास
असे वाटते क्षण थांबवून जावे
जेव्हा असती तू जवळपास
 
- रुपाली बर्वे