testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

व्हेलेंटाईन डे निमित्ताने उमेश - तेजश्रीची केमिस्ट्री दाखवणारे गाणे लाँच

Asehi Ekda Vhave
'प्रेम' ही कधीच न बदलणारी संकल्पना असून, ती नेहमीच एका नव्या रुपात आपल्यासमोर येत असते. प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणा-या प्रेमियुगुलांसाठी तर प्रेमाचा प्रत्येकदिवस नव्याने प्रेमात पडणारा असतो. अश्या या प्रेमवीरांसाठी खास व्हेलेंटाईन डे निमित्ताने 'भेटते ती अशी' हे रोमेंटिक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या आगामी सिनेमातील हे गाणे असून, सिटीलाईट माहिम येथे खास गुलाबी वातावरणात
या गाण्याचे दिमाखदार लाँँचिंग करण्यात आले. लाल रंगाची फुले, केक आणि फुगे अश्या रोमेंटिक अंदाजात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला.

येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील 'भेटते ती अशी' हे गाणे मराठीचा गुणी अभिनेता उमेश कामतवर चित्रित करण्यात आले आहे. उमेश - तेजश्रीची केमिस्ट्री मांडणारे हे गाणे, वैभव जोशीने शब्दबद्ध केले आहे. तसेच सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते ह्यांनी स्वतः हे गीत गायले असून, याचे संगीत दिग्दर्शनदेखील केले आहे. तसेच दिपाली विचारे ह्यांनी ह्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या भेटीची आठवण सांगणारे हे गाणे, प्रेमियुगुलांसाठी पर्वणी ठरत आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणा-या या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते असून त्यांचे मित्र रविंद्र शिंगणे यांचे बहुमूल्य सहकार्य यात लाभले आहे.


यावर अधिक वाचा :

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनची अनिश्चितता संपली

national news
दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे फँटम फिल्म ही ...

कंगना वाढवणार 10 किलो वजन

national news
बॉलिवूड अभिनेत्री कंगनाराणावत ही जोखी पत्करायला घाबरत नाही. मग ती रिअल लाईफ असो की रिल ...

रणवीर दीपिका लग्न : नेटकऱ्यांची नावाच्या चुकीवरून केली ...

national news
सोशल मीडिया अकाऊंटवरुन रणवीर आणि दीपिका या दोघांनीही त्यांच्या त्यांच्या लग्नाची अधिकृत ...

#Metoo प्रभाव: इंडियन आयडलमधून अन्नू मलिकची हकालपट्टी

national news
मुंबई- लैंगिक शोषणाचे आरोप असलेले संगीतकार अन्नू मलिक यांना इंडियन आयडल 10 च्या परीक्षक ...

येत्या १४ आणि १५ नोव्हेबरला दीपिका- रणवीरसिंहचे लग्न

national news
बॉलिवूडमधील लव्हबर्ड म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीरसिंह यांची जोडी अखेर 14 ...