मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

पक्षी सांगणार पती कसा मिळणार?

तुमचा पती कसा असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे? आणि तेही व्हॅलेन्टाईनच्या दिवशी. तर मग एक काम करा, व्हॅलेन्टाईनच्या दिवशी सकाळी लवकर उठून खिडकीबाहेरचे निसर्गसौंदर्य न्याहाळा. जो पक्षी तुम्हाला सर्वांत पहिल्यांदा दिसेल त्या आधारावर तुमचा विवाह कोणत्या व्यक्तीबरोबर होऊ शकेल याचा अंदाज तुम्हाला येईल. रोमन आणि ग्रीक काळातील पक्ष्यांवर केलेल्या अभ्यासाद्वारे असा दावा केला जात असे. या अभ्यासानुसार व्हॅलेन्टाईनच्या दिवशी अविवाहित मुलगी जो पक्षी पहिल्यांदा पाहिल, त्यावरुन तिला तिच्या भावी पतीचे संकेत मिळतील.

वुरसेस्टरशायर येथील पर्यटनतज्ज्ञांनी युरोपीय, मध्यकालीन अमेरिकी आणि देशी अमेरिकी लोककथांच्या आधारे एक गाईड तयार केले आहे. त्यात विविध पक्ष्यांना पाहिल्यानंतर भावी पतीच्या कार्यक्षेत्राबद्दल सांगण्यात आले आहे. गाईड सांगते की अविवाहित मुलींनी व्हॅलेन्टाईन डेला सकाळी नदीच्या किनारी किंवा अशा जागी गेले पाहिजे जिथे भरपूर पक्षी असतील.

 
ND
चला मग जाणून घेऊ या की पक्षीतज्ज्ञांचे 'गाईड लव्ह बर्ड'बद्दल काय सांगते :-
कबूतर : विवाहित आयुष्य आनंदात जाईल
रॉबिन : त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत पाण्याशी संबंधित असेल म्हणजे तो नेव्ही अधिकारी किंवा मच्छिमार असेल
मैना : जमिनीशी संबंधित काम करणारा म्हणजे शेतकरी किंवा पर्यावरणवादी
ब्लू बर्ड : हसतमुख असेल
कठफोडवा : विवाह होण्याची कोणतीच शक्यता नाही
बदक : त्याच्याबरोबर तुमचा संबंध घरगुती आणि स्थायी असेल
शिकारी पक्षी जसे घुबड किंवा गिधाड : व्यावसायिक, राजनितिक किंवा नेता असेल
किंगफिशर : तो आपल्या जन्मस्थानी परतेल.
ब्लॅकबर्ड : तो धार्मिक किंवा अध्यात्मिक क्षेत्रात असेल.