1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (16:03 IST)

वेलेंटाइन डे 2024 भारतातील या रोमॅंटिक जागेवर पार्टनर सोबत फिरायला जाऊ शकतात.

വാലന്റൈന്‍സ് ഡേ
वेलेंटाइन डे प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवरीला साजरा केला जातो. तसेच हा दिवस खूप खास आहे. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला, मित्रांना आणि जीवनसाथी सोबत आपल्या भावना व्यक्त करतात. आणि त्यांना सांगतात की तुमचासाठी ते किती स्पेशल आहे. वेलेंटाइन डे च्या पहिल्या आठवड्यापासून याची सुरवात होते. वेलेंटाइन डे च्या दिवशी लोक एकमेकांना कार्ड, फूल, चॉकलेट्स  इत्यादि अन्य उपहार देतात. तुम्ही या वेलेंटाइन डे ला तुमच्या पार्टनरला एखाद्या खास ट्रिपला घेऊन जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला अशा जागा बद्द्ल सांगू ज्या खूप सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. 
 
मसूरी 
पर्वतांची राणी असे संबोधली जाणारी मसूरी खुप प्रेक्षणीय आहे. जर तुमच्या पार्टनरला पर्वत-डोगरांमध्ये फिरायला आवडत असेल तर त्यांना या वेलेंटाइन डे ला मसूरीला घेऊन जा. इथे अशा काही जागा आहेत. ज्यांना पाहून तुमचे मन आनंदित होईल .
 
आगरा 
'जर गोष्ट प्रेमाची होत असेल तर ताजमहलचा उल्लेख नसेल' असे होणार नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ताजमहल फिरायला जाऊ शकतात. आगरा मध्ये ताजमहल सोबतच अजुन पुष्कळ प्रेक्षणीय स्थळ आहेत. 
 
नैनीताल 
नेहमी लोक फिरण्यासाठी नैनीताल जातात इथे येऊन तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच बोटिंग करा. यामुळे तुमच्यामध्ये प्रेम वाढेल. 
 
ऊटी 
फेब्रुवारी महिन्यात ठंडी थोडी कमी होते. तरी पण पर्वतांमध्ये तुम्हाला चांगलीच थंडी बघायला मिळेल. आशा मध्ये तुम्ही थंडीच्या वातावरणात तुमच्या पार्टनरसोबत ऊटीला फिरायला जाऊ शकता.