testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मतदान झाले, आता निकालाकडे सगळ्यांचे लक्ष

vidhansabha
मुंबई| wd| Last Modified गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (11:11 IST)
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. राज्यात सरासरी 62 टक्के मतदान झाल्याचा अंदाज शासकीय सूत्रांन‍ी वर्तवला आहे.

राज्यातील मतदारांनी उतस्फूर्तपणे मतदान करून 4,119 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला.11 वाजेनंतर मतदानाला प्रतिसाद वाढत गेला. गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांमध्ये दुपारी तीनपर्यंत मतदान पार पाडले. या भागात सुमारे पहिल्यांदा 44 टक्के मतदान झाल्याचे समजते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी एका मतदान केंद्रावर गोळीबार केला.

दरम्यान, मतदानाला सकाळी सुरुवात होताच विदर्भातील रामटेक जिल्ह्यातील सावनेरमधील एका मतदान केंद्रावर वीज कोसळून एक पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे मतदान प्रक्रियेत अनेकदा अडचणीही आल्या. मतदानावर या पावसाचा प्रचंड परिणाम झाला.

दुसरीकडे, नागपूरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडले होते.तसेच नाशिकमधील मनपा शाळेतील एक मतदान यंत्रही बंद पडल्याची माहिती मिळाली होती. मुंबईतील शिवडी येथेही बीडीडी चाळीतील बूथवर मतदान यंत्र बंद पडले आहे.

सातारा येथील पाटण तालुक्यातील भुरकेवाडी येथे एका कार्यकर्त्याने मतदार यादीत नाव नसल्याने व्होटींग मशिन जमिनीवर आदळून फोडले. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला. तसेच अभिनेता अभिषेक बच्चन, जया बच्चन, अभिनेत्री रेखा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडूलकर, शाहरुख खान, रणबीर कपूर, सलमान खान, आमीर खानची
पत्नी किरण राव, किरण खेर, अनुपम खेर आणि मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने मतदानाचा हक्क बजावला.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

काँग्रेसची निवडणूक तयारी, जबाबदाऱ्याचे केले वाटप

national news
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रचाराची रणनिती ठरविण्याची जबाबदारी काँग्रेसचे ...

मेगा नोकरभरती, शैक्षणिक भरतीला स्थगिती नाही

national news
मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मराठा ...

म्हणून मनसेने सर्व तिकीटे घेतली

national news
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाच्या स्पेशल ...

कारचे टायर फुटून अपघात, एकाच कुटूंबातील तिघे ठार

national news
नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळल्याने ...

सूर्यनमस्‍कार दिन : १० हजार विद्यार्थ्यांनी घातले ...

national news
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका महिला व बाल कल्‍याण समिती, सुभेदारवाडा कट्टा आणि माध्‍यमिक- ...