राष्ट्रवादीची देहबोली काँग्रेसविरोधी, मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप
आगामी विधानसभेच्या 144 जागांसाठी राष्ट्रवादीचे नेते अडून बसले आहे. परिणामी दोन्ही काँग्रेसमधील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यात राष्ट्रवादीची देहबोली कॉंग्रेस विरोधात असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांअडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. राष्ट्रवादीची देहबोली आघाडी तोडावी अशीच आहे. परंतु 15 वर्षांपासूनची आघाडी तोडण्याची आपली इच्छा नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कॉँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते समाधानी नाहीत. आमची विजयाची संधी हुकवण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करण्याची त्यांची परंपरा आहे. राष्ट्रवादीची देहबोली कॉंग्रेसविरोधी असल्याचे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे.
मुख्यमंत्री आणि पक्षाची कामगिरी यांच्यात भेद करता येऊ शकत नाही. पक्षाचा विजय सर्वांचाच असतो, असे चव्हाण म्हणाले. जनतेत माझ्याबद्दल सकारात्मक भावना असेल मतदानात प्रतिबिंब उमटेल, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.