शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (10:57 IST)

काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ

आगामी विधानसभा निवडणुका दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. त्यात कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीचे नेते आघाडी तोडण्याची भाषा करत असतानाच काँग्रेसने मात्र थेट प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. हुतात्मा चौकात शहिदांना अभिवादन करून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) सकाळी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रचार ज्योतीचे प्रज्वलन करून ही ज्योत आझाद मैदानात आणली जाणार आहे. तेथे ज्योतीचे महाज्योतीत रुपांतर करण्‍यात येणार आहे. या महाज्योतीतून राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक 54 जिल्ह्यांसाठी 54 ज्योती प्रज्वलित केल्या जाणार आहे. त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये नेऊन तेथेही प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आदी नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.