शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (17:27 IST)

निलेश राणेंची गुहागरमधून माघार

काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. माझा कोणत्याही पक्षाला विरोध नव्हता आणि रहाणार ही नाही, पण अप्रत्यक्षरित्या भास्कर जाधवांच्याविरोधात काम करणार असल्याचे जाहीर केले.  

दुपारी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी याबाबतची माहिती दिली असून मी माझा आपला निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेत आहोत. राणेंसाहेबांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आमचे लक्ष्य भाजप-शिवसेनेला पराभूत करण्याचे असल्याने हा निर्णय घेत आहे. राणेंसाहेबांना आघाडीत बिघाडी होऊ नये, असे वाटत आहे. साहेबांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले. आपण कोणत्याही पक्षाविरोधात नाही. राष्ट्रवादीच्या तर अजिबात नाही. मात्र काही व्यक्तींच्याविरोधात आपण संघर्ष करणार आहोत.