शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (19:05 IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल- उद्धव ठाकरे

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होऊनत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे 'आजतक'शी बोलत होते. 'आम्ही आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतोय का?' असा प्रतिनिधीने प्रश्न केला असता 'तुमच्या तोंडात साखर पडो', अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी दिली. याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे.

उद्धव म्हणाले, मी स्वप्न पाहाणार्‍यांपैकी नाही. विशेष म्हणजे मला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नाही परंतु जबाबदारीही मी झटकणार नाही. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. माझ्यावर जबाबदारी आली, तर महाराष्ट्राला नंबर एक बनवून दाखवेल. उद्धव ठाकरे हा चेहरा महाराष्ट्रातील जनतेला विश्वासू वाटत असेल, तर चांगली गोष्ट आहे, जनतेलाच मतदान करायचे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

आम्ही मोठ-मोठ्या लाटा पाहिल्या आहेत. आमच्याजवळ समुद्र आहे. सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेना युतीमध्ये मोठा भाऊ-लहान भाऊ असे काही नसल्याचेही उद्धव म्हणाले.