testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अनादी मी, अनंत मी अवध्य मी

- कै. आचार्य बाळाराव सावरकर

savarkar
ND
आपल्या देशावर असलेले परकीय इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्रयत्न केले. या देशभक्तांत एक गट होता शस्त्रवादी क्रांतिकारकांचा. हा गट सांगे इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी आपण येथील इंग्रज अधिकार्‍यांच्या मनात भीति उत्नन्न केली पाहिजे. त्यांना शस्त्राने ठार मारले पाहिजे. या गटात 1857 चे नेते नानाराव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रभृतिंची नावे प्रमुख आहेत. असा सशस्त्र शक्तीचा पुरस्कार करण्यासाठी श्री. विनायक दामोदर तथा सावरकरांनी तरुण वयात वीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर तानाजी मालुसरे, चाफेकर बंधू यांचे पोवाडे रचले. शिवाजी महाराजांची आरती केली.

बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सन 1906 मध्ये 23 व्या वर्षी ते इंग्लंडची राजधानी लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी इटलीचे रामदास जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र लिहिले. तसेच 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हे ही पुस्तक लिहिले. ही पुस्तके वाचणारा वाचक देशभक्त बनेल, आपले राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करील या भीतीने इंग्रज सरकारने ही पुस्तके छापण्यास आणि वाचण्यास बंदी घातली. ही पुस्तके छापण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे थोरले बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांस ब्रिटीश सरकारने जन्मठेप व काळेपाण्याची शिक्षा‍ दिली. या शिक्षेचा सूड घेण्यासाठी मदनलाल धिंग्रा यांनी भर लंडनमध्ये कर्झन वायली या इंग्रज ‍अधिकार्‍यास सन 1909 मध्ये गोळी घालून ठार मारले. त्याच्या पाठोपाठ नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या तरुणाने गोळी घालून वध केला.

वेबदुनिया|

जॅक्सनला मारण्यासाठी वापरले गेलेले पिस्तूल सावकरांनी पाठविलेले होते असे समजून ब्रिटीश सरकारने लंडनमध्ये सावकरांना पकडले आणि भारतात पाठविले. भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस या सिंधूद्वाराजवळ नौकेतून समुद्रात उडी मारली! आणि ते ब्रिटीश शिपायांनी त्यांच्यावर झालेल्या बंदुकीच्या गोळ्या चुकवत पोहत पोहत फ्रान्सच्या किनार्‍यावर पोचले. ब्रिटीश पोलीसही त्यांच्या पाठोपाठ होडीतून तेथे पोचले आणि त्यांनी सावरकरांना पकडून पुन्हा बोटीवर आणले! आणि त्यांना मारण्याच्या धमक्या देऊ लागले. तेव्हा सावरकरांनी त्यांना सांगितले मला हात लावाल तर लक्षात ठेवा माझे मित्र तुम्हाला सोडणार नाहीत, तेथे त्यांनी कविता रचली 'अनादी मी, अनंत मी अवध्य मी भला। मारिल रिपु कवण असा जगती जन्माला?


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

क्रिकेटच्या सामन्यामुळे सानिया मिर्झा अचानकपणे ट्विटरवरून ...

national news
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेटचा सामना रंगणार आहे. त्यामुळे ...

Facebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक

national news
दुनियेत फेसबुक सर्वात अधिक वापरण्यात येणारा सोशल मीडिया मीडियम आहे. पर्सनल ...

लेस्बियन पत्नी विरुद्ध पतीची पोलीसात तक्रार

national news
उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये एका पतीने पत्नीविरोधात ती लेस्बियन असल्याची तक्रार पोलीस ...

गडकरी शब्द पाळतात, गंगा नदी स्वच्छ होणार : आनंद महिंद्रा

national news
गंगा नदी मार्च २०२० पर्यंत पुर्णपणे स्वच्छ केली जाईल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

नवज्योतसिंग सिध्दू पाकिस्तानचे एजंट

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार्‍या नवज्योतसिंग ...