testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मदमत्त गूढांनो!

डॉ. सौ. उषा गडकरी

वेबदुनिया|

लहानपणी बरेच वेळा ऐकले होते,
वाचले होते आणि प्रत्यक्ष पाहिलेही होते
त्या महामानवाबद्दल खूप काही.

त्याच्या घणाघाती वक्तृत्वाची
जाज्वल्य देशप्रेमाने अभिमानित
असलेली ध्वनीफित ऐकुनही
रोमांच उभे राहिले होते अंगावर!

जाणवले होते, डोक्यावरच्या आभाळाच्याविस्ताराला सीमा नसते, सागराच्या लाटाच्या
खोलीला पार नसतो, हिमालयाच्या उत्तुंग
शिखरांचा थांग लागत नाही,

तशीच त्याच्या धाडसाच्या गगनभरारीला सीमा नव्हती
धैर्याच्या मेरूमांदारांनाही चळचळा कापायला लावणार्‍या
भेदक दृष्टीचा तांग लागत नव्हतामर्सेलिसर्‍या ऐतिहासिक उडीने
साक्षात जल महाभूताचे भेदन केले होते
दोन जन्मठेपी एकाच वेळी भोगत
सेल्युलर जेलरच्या कालकोठड्या नाही
थरथरायला लावले होते
कोलू ओढर्‍याच्या अमानुष शिक्षेने
पत्थरालाही पाझर फोडला होता
उत्स्फूर्त काव्यपंक्तिंनी रोमरोमातराष्ट्रभिमानची ज्योत चेतवली होत

पतीतपावन चळवळीद्वारा
पददलितांचे अश्रु पुसले होते
ढोंगीपणा, दांभिकता, अंधश्रद्धा
यांना मूळापासून उखडून फेकून दिले होते
'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले'?
असा खडा सवाल करून गुलामीच्या, पारतंत्र्याच्या बेड्या
खळखळा तोडून टाकण्याचे आवाहन कले होते?
घरादावावर तुळशीपत्र ठेऊन, स्वांतंत्र्य वेदीच्या
होमकुंडात स्वत:ला झोकून दिले होते.
स्वातंत्र्यानंतर मात्र आजुबाजूच्या तथाकथीत
नामांकित, अतिविद्वान, स्वनामध्य शासकांच्या
अंतरंगातले खुजेपण, दाभिकता आणि कल्पना दारिद्रयकुठुनतरी सणसणीत गोटा डोक्याला लागावा
आणि भळभळून रक्त यावे,
तसे वेदना देऊन गेले

सूर्यावर धुंकण्याच्या या प्रवृत्तिच्या
कसा आणि किती निषेध करावा
हे कळेनास झाले
परंतु लाल घोड्यांच्या घोळक्यांत
खोट्या शिक्यांच्या बद्द, बदसूरआवाजाच्या तुलनेत
सुवर्णाच्या खणखणीत नाष्याचा नाद
अनाहत नादासारखा
अंर्तमनात अखंड चालू रहावा
तसा त्या महामानवाचा
समृद्ध वारसा घेऊन
स्वतंत्र भारतात आज आपण
सर्वच श्रीमंत झालो आहोत
भले ही काही नतदृष्टांना
ते पटो वा न पटो!
मदमस्त मूढांनो, ज्वालामुखीचे विवर उघडू नको


यावर अधिक वाचा :

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...

रेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी

national news
शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...

नोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा

national news
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...

स्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन

national news
जर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...

व्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर

national news
यापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

national news
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...