testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा

vitthal
वेबदुनिया|
पंढरपुरात विटेवर अठ्ठावीस युगापासून उभा असलेला तो सावळा नेमका आहे तरी कोण? त्याची दैवत परंपरा तरी कोणती तो शैव की वैष्णव परंपरेतला? सामान्य वारकऱ्याला हे प्रश्न पडायचे कारण नाही. कारण द्वैतवादाचा सिद्धांतच मुळी त्याच्या चरणी लीन झाले की संपुष्टात येतो. पण त्याचे गुणगान गाणाऱ्या संतांनी तरी त्याला कोणत्या रूपात पाहिलंय? संतांनी त्याला विविध रूपांत पाहिले असले तरी ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत सर्वांमध्ये तो कृष्णरूप आहे, यावर मात्र एकमत आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक रां. चि. ढेरे यांनी आपल्या विठ्ठल- एक महासमन्वय या पुस्तकात यासंदर्भात केलेले संशोधन मांडले आहे.
विठ्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटानाबाबतीत चार कथा आहेत. या चारही कथात विठ्ठलाच्या कृष्णारूपावरच शिक्कामोर्तब होते.
स्कांद पुराणातील पांडुरंग महात्म्यातली कथा हेच सांगते. द्वापार युगाच्या अंती अठ्ठाविसाव्या कल्पात पंढपूरजवळ असलेल्या पुष्करिणी नदीच्या तीरावर आश्रम बांधून पुंडरीक मातापित्यांची सेवा करीत होता. त्या भक्तीने संतुष्ट होऊन कृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी येतो. त्याच्या आग्रहाखातर तो पंढरपूरास वास्तव्य करतो. ही कथा परिचित आहेत.

पद्मपुराणातील पांडुरंग महात्म्यात वेगळीच कथा आहे. दिंडीरव वनात उन्मत्त झालेल्या दिंडीरव दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण करून लोहदंडाने त्याचा वध केला.'' शेवटी यातील विष्णू म्हणजे हरीच आहे. कृष्ण हाही हरीच. त्यामुळे याही कथेत कृष्ण आहेच.

त्याच पद्मपुराणाच्या पहिल्या अध्यायात, कृष्णाने रुसलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी भिमेच्या काठी असलेल्या दिंडीरवनात गोपवेषात प्रवेश केला. तेथे त्याने तिची समजूत काढली. या कथेतही कृष्ण आहे.

पांडुरंग प्रकटनासंदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. पद्मा नावाच्या एक सुंदर युवतीने इष्टवर प्राप्तीच्या इच्छेने तपश्चर्येला आरंभ केला. त्यावेळी देव तिच्याहून सुंदर रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाला. देवाचे सुंदर रूप पाहून तिचे भान हरपले. तिचे वस्त्र गळाले. केस मोकळे झाले. तिच्यामुळेच पंढरपूरजवळ असणारे मुक्तकेशी हे तीर्थ निर्माण झाले.(स्कंद पुराणानुसार ती एक अनाम गोपी होती तर पद्मपुराणानुसार ती चंद्रसेनाची मुलगी होती.)

या चारही कथा विठ्ठल हा मूळ कृष्णरूपच होता, हे सांगणाऱ्या आहेत. पण त्याचवेळी पुंडलिकासाठी पंढरीत प्रकटलेला देव हा गोपवेषधर आहे हीच धारणा ज्ञानदेव-नामदेवांपासून सर्व संतांनीही पुन:पुन्हा उच्चारली आहे.
ज्ञानेश्वर म्हणतात.

पुंडलिकाच्या भावार्था। गोकुळाहूनी जाला येता।।
निजप्रेमभक्ति भक्ता। घ्या घ्या आता म्हणतेस।

पुंडलिक गोकूळातून आला होता, याचे स्पष्टिकरण ज्ञानेश्वरांनी यातच दिले आहे. शिवाय ज्ञानदेवांनी `गोपवेषे, निराळे` या ओळीत कृष्ण-विठ्ठल रूपाची एकात्मता साधली आहे. ज्ञानेश्वरांच्या भावविश्वात कृष्ण आणि विठ्ठलाची पूर्ण एकरूपता झाली आहे.

तोहा विठ्ठल बरवा।
तो हा माधव बरवा।

या ओळीतून ज्ञानदेव त्यांच्यातील भेद संपवून टाकतात. ज्ञानदेवांच्या अनेक विराण्या गोपीच्या विरहवेदनेतून साकारल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

रुद्राक्ष आणि आरोग्य

national news
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने ...

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राहू-शनीचा कुप्रभाव

national news
कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

राशिभविष्य