testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंढरीत भक्तीचा महापूर

vitthal
पंढरपूर| wd| Last Modified बुधवार, 9 जुलै 2014 (10:00 IST)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा राज्यात पावसाने ओढ दिल्याने यांच्याच्या आषाढी महासोहळ्यावर याचा परिणाम दिसून येत असून यंदा गर्दी कमी आहे. पंढरीत दशमीपर्यंत किमान सात लाख भाविक दाखल झाले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल व रखुमाईची महापूजा करणार आहेत.


आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळे पंढरीत दाखल झाल्यानंतर येथे भाविकांची गर्दी झाल्याचे
दिसत आहे. दरमन, गतवर्षीच्या तुलनेत यात्रा कमी भरली आहे. प्रतिवर्षी किमान दहा लाख भाविक या यात्रेस येतात व प्रशासन ही एवढी संख्या गृहीत धरून नियोजन करीत असते मात्र यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम आषाढी यात्रेवर झाला आहे. य सोहळ्यास अंदाजे सात लाख भाविक आले असावेत असा अंदाज आहे. पालख्यांसमवेत असणार्‍या भाविकांमध्ंस यंदा घट दिसून आली आहे.


आषाढी दशमी दिवशी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे वाखरीतून पंढरीत दाखल झाले आहेत. येथील वातावरण विठूमय झाले असून हरिनामाचा गजर सर्वत्र सुरू आहे. चंद्रभागा वाळवंटात भाविकांची दाटीवाटी असून पवित्र स्नानासाठी गर्दी उसळली होती. श्री विठ्ठलाच पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांची संख्या वाढली असून गोपाळपूरच्या पुढे इंजिनिअरिंग कॉलेजकडे ती पोहोचली आहे. सुमारे एक ते सव्वा लाख भाविक रांगेत असावेत असा अंदाज आहे.


आज एकादशी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सपत्नीक श्री विठ्ठल व रूक्मणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. यासाठी मंदिर समितीने तयारी केली आहे. बुधवारी रात्रौ 1 ते 1.30 खाजगीवाले यांची पाद्यपूजा, 1.30 ते 2.30 नित्य पूजा, 2.30 ते 2.55 विठ्ठलाची महापूजा तर 3 ते 3.20 रूक्मिणी महापूजा, 3.25 ते 4 या वेळात मानाचा वारकरी व मुख्यमंत्री यांचा सत्कार सोहळा होणार आहे. पहाटे एक ते चार या काळात दर्शन बंद राहणार आहे.


दरम्यान, आषाढी एकादशीसाठी मंदिर समिती, महसूल, नगरपरिषद, पोलीस यासह सर्वच शासकीव विभागांनी नियोजन केले आहे. यंदा मोठा बंदोबस्त यात्रेसाठी देण्यात आला आहे. एक जिल्हा पोलीस अधीक्षक, पाच अतिरिक्त अधीक्षक यासह तीनशे अधिकारी, तीन हजार पोलीस, एक हजार गृहरक्षक, नऊ राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा व 8 बॉम्ब शोधक व निकामी करणारी पथके, श्वान पथके यासह घातपातविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणाची तपासणी घातपातविरोधी पथके रोज करीत आहेत.


याचबरोबर यंदाच्या आषाढी यात्रेसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार हजार शौचालये पंढरीत उभारण्यात ली आहेत. याचा वापर भाविकांनी करावा असे आवाहन प्रशासनाचवतीने करण्यात आले आहे. शहरात स्वच्छता व नियोजन राहावे तसेच कामात सुसूत्रता असावी यासाठी चार मुख्याधिकारी नेमण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यासह 150 वैद्यकीय अधिकारी आरोग्य
सुविधा देत आहेत. अग्निशामकदल, अँम्बुलन्स यांची सोय शहरात करण्यात आली आहे. शंभर खाटांचे कॉलरा रुग्णालय सुरू करण्यात
आले आहे. वरिष्ठ अधिकारी पंढरीत तळ ठोकून बसले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांचा यात समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

राशिभविष्य