शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (08:43 IST)

आषाढी एकादशी: एकादशीचे व्रत कसे साजरे करावे

यादिवशी लवकर उठून घराची स्वच्छता करून घरात पवित्र पाणी शिंपडावं.
शास्त्राप्रमाणे सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवते बरोबर विष्णूची पूजा करावी. 
सुवर्ण, चांदी, तांबे, पितळ यांच्या मूर्ती करून त्यांची यथाविधी पूजा करावी. 
त्यास पीतांबर नेसवावा आणि शुभ्र वस्त्राने आच्छादित गादी आदींनी सुशोभित पलंगावर झोपवावे.
पुजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने वाहावीत
या दिवशी उपवास करावा. 
उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा. 
या दिवशी रात्री भजन-किर्तन करावे, हरी कथा श्रवण करावी. 
दुस-या दिवशी सूर्यादयानंतर पारणे सोडावे. 
या दिवसापासून चार महिनेपर्यंत आपल्या आवडीच्या पदार्थाचा त्याग करावा. 
मधुरस्वरासाठी 'गूळ' 
पुत्रपौत्रादी सुखासाठी 'तेल' 
शत्रुनाशासाठी 'कडू तेल' 
सौभाग्यवर्धनासाठी 'गोड तेल'
वंशवृद्धीसाठी 'दूध' 
सर्वपापाक्षयार्थ 'एकभुक्त, नक्त, अयाचित' व्रत किंवा उपवास करावा. 
या चार महिन्यांत दुसर्यांनी दिलेले पदार्थ भक्षण करण्याचा त्याग करावा.