testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

योगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका

hindu dharma
Last Modified शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (17:26 IST)
अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही.. कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं. योगासनांनी तुमचं स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी तुम्हाला खूप मदत होऊ शकते आणि मुख्य म्हणजे योगासनं हृदय विकाराचा धोका कमी करतात. योगासनांमुळे तुमचा ताणतणावदेखील दूर होण्यास मदत होते. नेदरलँड आणि अमेरिकन संशोधकांच्या म्हणण्यानुसार, योगासनं ही खूप फायदेशीर आहेत त्याचबरोबर ती तितकीच साधी आणि सहज आहेत ज्यामुळे आपला हृदयविकाराचा धोका कमी होतो.

हृदयाशी निगडित आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुम्हाला जर पारंपरिक कसरत करणं जमत नसेल तर काळजी न करता योगासनांच्या पर्यायाची निवड करा, असा सल्ला शोधकर्त्यांनी दिलाय.

रोटरडम स्थित इरेस्मस युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर आणि बोस्टनस्थित हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर आणि मुख्य लेखक मिरियम हूनिंक यांच्या म्हणण्यानुसार, योग आपलं शरीर सशक्त बनविण्यासाठी उपयोगी ठरतात.. त्याचमुळे ते रोगांचे धोके टाळण्यासाठीही उपयोगी ठरतात.


यावर अधिक वाचा :