मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (21:51 IST)

Figure 36-24-36 फिगर हवा आहे, मग हे करा

bhujangasana
प्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की तिची बॉडी 36-24-36 साईजची असावी. छोटीशी कंबर आणि सडपातळ फिगर मुलींना आवडते. अशा फिगरचे स्वप्न बघत असाल तर त्यासाठी तुम्हाला रोज आसन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही 36-24-36  साईज बनवू शकता. योगाच्या मदतीने तुम्ही तुमची बॉडीवरची चरबी कमी करू शकता. हे आसन केल्यामुळे तुम्ही तुमची बॉडी लवचिक बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी भुजंगासन करायला पाहिजे.  
भुजंगासन 
हे आसन केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते. सोबतच कंबरही छोटी होते आणि शोल्डर मजबूत होतात. 
भुजंगासन करण्यासाठी काही नियम- 
आधी पोटावर सरळ झोपा आणि दोन्ही हात डोक्यांच्या खाली ठेवा. 
दोन्ही पायांचे पंजे सोबत ठेवा. 
आता डोके समोरून उचला आणि खांद्याच्या बाजूने हात राहू द्या. असे केल्याने बॉडीचे वजन आपल्या बाजूने पडले पाहिजे. 
आता बॉडीच्या वरील भागाला हाताच्या आधारे उचला. 
शरीर ताणून एक लांब श्वास घ्या. 
 
पाश्चिमोत्तासन 
हे आसन केल्याने तुम्ही आजारापासून तर दूर राहालच तसेच तुमचे शरीर लवचिक राहील. 
पाश्चिमोत्तासन करण्याचे नियम- 
हे आसन करण्याआधी सरळ बसा. दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवा. 
दोन्ही हातांना वर उचला आणि कंबर पूर्णपणे सरळ ठेवा.पुन्हा वाकून दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. 
लक्षात ठेवा की गुडघे न वाकू देता आपले पाय जमिनीच्यावर उचला. 
 
पूर्वेत्तासान
हे आसन आपल्या शरीराचा खालचा भाग आणि शोल्डर ला सुडौल बनवते. या आसनामुळे शरीर लवचिक राहते. 
पाय समोर तानत सरळ बसा 
पंजे जोडलेले पाहिजेत आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. 
आता दोन्ही हात जमिनीवर टेकवत कंबरेच्या वरचा भाग वर उचला. 
काही सेकंद या अवस्थेत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य अवस्थेत या. 
लक्षात असू द्या की प्रेग्नेंट अवस्थेत हे आसन करू नका. 
वर दिलेले हे तिन्ही आसन केल्याने नक्कीच तुमच्या बॉडीचा शेप 36-24-36 होण्यास मदत मिळेल.