शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (10:49 IST)

Yoga Clothes योगा करताना कोणते कपडे घालावेत

yoga clothes
योगामुळे केवळ तंदुरुस्तीच नाही तर मनाला शांती देखील मिळते. आणि जी ह्या धावपळीच्या जगात खूप महत्वाची आहे. योगा हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतींचा एक समूह आहे, जो भारताचा मूळ असून कित्येक दशकांपासून केला जात आहे. आपल्या श्वासोच्छवासाचे निरीक्षण करण्यासह ध्यान आणि आराम करणारी हि कला संपूर्ण शरीर आणि मनाची कसरत करते. आपल्या पंतप्रधानांपासून ते बॉलीवूड आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी पर्यंत योगाचे अनुसरण करताना पाहायला मिळते.
 
योगा करताना गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. योगा करण्यासाठी एक चटई (मॅट), हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याचा बाटली, एक टॉवेल (घाम टिपण्यासाठी) आणि योग्य आऊटफिट! कमजोर फॅब्रिक असेल तर आसन करताना फाटण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे योग्य आऊटफिट निवडणे तितकेच महत्वाचे आहे. बॉलीवुड सेलिब्रिटीज योगाचे मोठे चाहते आहेत, आपण आसन करताना दिवा म्हणून फॅशनेबल दिसावे यासाठी ते नेहमीच काळजी घेतात! स्पायकर लाइफस्टाइलचे डिझाइन हेड श्री. अभिषेक यादव आणि श्री. नेल्सन जाफरी, हेड ऑफ डिझाईन लीवा यांनी सेलिब्रटीजकडून माहिती घेत योगा करण्यासाठी ५ योग्य आऊटफिटची माहिती सांगितली आहे.
 
स्लिम जॉगर्स: हि आधुनिक जॉगर्स ट्रॅक पॅन्ट असून आरामदायक तितकीच सुपर- ट्रेंडी सुद्धा आहे. फॅब्रिक आरामदायक आणि मुलायम तर आहेच शिवाय तुमच्या शरीराला चिकटून राहत नाही, त्यामुळे योगा करताना अडचण येत नाही.  
 
बॅग्गी क्रॉप टॉप: हा असा महिलांचा फॅशन ट्रेंड आहे जो कधीं जुना होत नाही. १९७० च्या दशकापासून क्रॉप टॉप फॅशनमध्ये आहेत. मुख्यतः वाढत्या फिटनेस जागरूकतेमुळे क्रॉप टॉप्स आता फॅशन घटक बनले आहे. हे उत्कृष्ट दर्जाचे आरामदायक आणि स्टाइलिश लुक देतात. याचे फॅब्रिक व्हिस्कोस आणि कॉटन सारख्या आरामदायक कापडांपासून बनविलेले असते. 
 
GYM JNS: विशेषतः खेळाच्या दृष्टीने बनवलेली हि जिम जीन्स आहे, ही डेनिम लवचिक असल्याने योगा करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे. एक नाविन्यपूर्ण सूक्ष्म तंत्रज्ञान वापरून याचे फॅब्रिक बनवले आहे, जे लवकर वाळते. त्यामुळे कितीही घाम आले तरी लगेचच कपडे सुकू शकतात.
 
लेगिंग / योगा पॅन्ट्स: नावाप्रमाणेच योगा करण्यासाठी योग्य पॅंट्स आहे. व्हिस्कोस सारख्या कपड्यांपासून बनवलेले असून ते फक्त मुलायम किंवा आरामदायीच नसून तुमच्या स्किनला अगदी योग्यरीत्या शोभून दिसतात. घाम लगेचच सुकण्यास मदत करते. त्यामुळे अंगाला चिकटपणा जाणवत नाही. हि सर्वोत्तम योगा पँट्स आहे.
 
सायकलिंग शॉर्ट्स: अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीना सायकलिंग शॉर्ट्स, हूडीज आणि टी-शर्टसह पहिले आहे, कारण खेळामध्ये शरीराला सगळ्यात आरामदायक जाणवणारे ही कपडे आहेत. मजबूत बांधणी तसेच, मजबूत कापड आणि लवचिकपणा मुख्य वैशिष्टये आहेत. सुपर स्ट्रेची शॉर्ट्स नक्कीच वापरुन पहा!