1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (21:47 IST)

Yoga and Positive Attitude योगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन

Yoga and Positive Attitude
Yoga and Positive Attitude योगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद साधता येतो. योगाभ्यास करीत असताना काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असते. योग्य व पध्दतीने केलेल्या योगसाधनेद्वारा अधिक लाभ होतात. हे आपल्याला विसरून चालणार नाही. 
 
योगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन- 
कोणतेही कार्य करताना सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. योगाभ्यास ही हा नियम लागू पडतो. योगसाधना करण्यापूर्वी आधी मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला केले पाहिजे. त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक लक्ष्य ठेवले पाहिचे. योगाभ्यास करीत असताना अधिक उत्सह ही आपल्याला नुकसानदायक ठरू शकतो. योगसाधना करीत असताना एक दैनंदिनी तयार केली पाहिजे. आपण आत्मसात केलेले पाठ व ते करत असताना आपल्याला आलेल्या अनुभवांच‍ी त्यात नोंद केली पाहिजे.
 
योगासाठी एक वेळ ठरवून घ्यावी- 
नियमित केलेल्या गोष्टीची आपल्याला सवय जडते. कालांतराने ही सवय आपल्या जीवनाचा हिस्सा बनून जाते. योगाभ्यासही आपल्या जीवनाचा भाग बनून जावा म्हणून योगसाधनेसाठी दिवसभरातून आपल्या सोयी एक ठराविक वेळ ठरवून दिली पाहिजे. 
 
सुरवातीला जे जमेल ते हळू हळू व योग्य पध्दतीने करावे. कालांतराने योगसाधनेचा कालावधी टप्प्या टप्प्याने वाढवावा. नियमित 40 ते 90 मिनिटे योगासने करावीत. आपण करत असलेल्या योगाभ्यासात तल्लीन होणे महत्त्वाचे आहे. 
 
योग व भोजन
योगासने नेहमी अंशीपोटी करावा. जेवन आधी केले असल्याच त्याच्या दोन ते तीन तासानंतर करावे. शक्यतो योगासने सकाळी करावेत. योगाभ्यास करण्यापूर्वी चहा, कॉफी, सिगारेट, दारू, तंबाखू यांचे सेवन करू नये.