शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (06:38 IST)

फुफ्फुसाचा व्यायाम भस्त्रिका प्राणायाम कसा करावा

How to do Bhastrika Pranayama
Yoga for lung strength: कपालभाती प्राणायाम प्रमाणे, भस्त्रिका प्राणायाम फुफ्फुसांना मजबूत करते आणि त्यांची कार्यक्षमता वाढवते. मात्र, दोन्ही प्राणायाम योग शिक्षकाच्या सल्ल्यानेच करावेत. भस्त्रिका प्राणायाम कसे करतात जाणून घ्या 
 
भस्त्रिका प्राणायाम : भस्त्रिकेचा शाब्दिक अर्थ भाता आहे. लोहार भात्याने हवा जलद गतीने सोडत लोखंड गरम करतो. त्याच प्रमाणे भ्रस्तिका प्राणायाम शरीरातील अशुद्धता आणि नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी भाताप्रमाणे कार्य करतो. या प्राणायामाने  शुद्ध हवा आत घेतो आणि अशुद्ध हवा बाहेर फेकतो.
 
कसे करावे -
सिद्धासन किंवा सुखासनामध्ये बसून कंबर, मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवून शरीर आणि मन स्थिर ठेवा. डोळे बंद करा.
 
नंतर जलद श्वास घ्या आणि वेगाने श्वास सोडा.
श्वास घेताना पोट फुगवा आणि श्वास सोडताना पोटाला आत घ्या.असं केल्याने नाभीस्थळावर दाब येतो. 
हे प्राणायाम चांगल्या प्रकारे शिकून 30 सेकंदात करता येतो. 
 
खबरदारी: भस्त्रिका प्राणायाम करण्यापूर्वी नाक पूर्णपणे स्वच्छ करा. भ्रास्त्रिका प्राणायाम सकाळी मोकळ्या व स्वच्छ हवेत करावा. हा प्राणायाम एखाद्याच्या क्षमतेपेक्षा जास्त करू नये. हा प्राणायाम दिवसातून एकदाच करा. कोणाला काही आजार असल्यास योग शिक्षकाचा सल्ला घेऊनच हा प्राणायाम करावा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit