शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 19 एप्रिल 2017 (21:04 IST)

योगादिनी संयुक्तराष्ट्रांनी एक विशेष तिकीट प्रकाशित करणार

yoga day special

येत्या 21 जुन रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त संयुक्तराष्ट्रांनी एक विशेष तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्तराष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी ट्‌विटरवर ही माहिती दिली. यानिमित्ताने पोस्टल ऍडमिनीस्ट्रेशनतर्फे त्यादिवशी एका विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या टपाल तिकीटांवर ओम हे पवित्र अक्षर लिहीले जाणार असून योगाची विविध आसनेही त्यावर दर्शवण्यात आली आहेत. सन 2015 पासून संयुक्तराष्ट्रांत योग दिन साजरा केला जातो. डिसेंबर 2014 मध्ये संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत योगदिनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्याला 177 राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे. टपाल तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या न्युयॉर्क, जिनीव्हा, आणि व्हिएन्ना येथे एकाच वेळी होणार आहे.