तनुश्री दत्ताने लावला नाना पाटेकरवर केला विनयभंगाचा आरोप, पण एकही पुरावा हाती लागला नाही
बॉलीवूड कलाकारा तनुश्री दत्ताने मागील वर्षी मीटू कँपेन अंतर्गत नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून सर्वांना आश्चर्यात टाकलं होतं. तनुश्रीने यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलिस स्टेशनात एफआयआर दाखल केली होती. परंतू आता नाना पाटेकरविरुद्ध लैंगिक छळ या प्रकरणाची चौकशी डेड एंडवर पोहचल्यासारखी दिसून येत आहे.
एफआईआर दाखल झाल्याच्या 7 महिन्यांनंतर देखील पोलिसांना तनुश्रीच्या आरोपाला समर्थन करणारा एकही साक्षीदार मिळालेला नाही, त्यामुळे प्रकरण पुढे वाढवता येत नाहीये. पोलिसांप्रमाणे त्यांनी 12 ते 15 साक्षीदारांचे विधान घेतले आहे परंतू कोणतेही स्टेटमेंट तनुश्रीच्या आरोपांचे समर्थन करत नाही. थेट सांगायचे तर साक्षीदारांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे.
यामुळे आता पोलिस तनुश्रीचे आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यावेळी तेथे उपस्थित साक्षीदारांना काही लक्षात नाही किंवा ते स्पष्ट काय घडले सांगण्यात असमर्थ आहे.
घटना 2008 मध्ये चित्रपट हॉर्न ओके प्लीज च्या एका आयटम डांसच्या शूट दरम्यान घडली असल्याचे सांगितले गेले आहे. साक्षीदारांमध्ये डेजी शहाचे नाव देखील सामील आहे. डेजी तेव्हा गणेश आचार्याची असिस्टेंट होती. साक्षीदारांमध्ये अधिकश्या बॅकग्राऊंड डांसर आणि सेटवर त्यावेळी उपस्थित कर्मचारी आहेत. डेजीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आपले वक्तव्य दिले होते आणि त्याप्रमाणे त्यांना फारसं काही आठवत नाहीये.
तरी, तनुश्रीने दावा केला आहे की साक्षीदार आता विरोधी झाले आहेत कारण त्यातून काही नानाचे मित्र आहेत तर काहींना धमकी मिळाली असावी. परंतू तनुश्रीला न्याय मिळेल यावर पूर्ण विश्वास आहे. तनुश्रीप्रमाणे ही लढाई केवळ स्वत:साठी नव्हे तर इंडस्ट्रीमधील त्या सर्वांसाठी आहे ज्यांचे शोषण होत आहे.