1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By चंद्रकांत शिंदे|

नटरंगने कमावले ७ कोटी रुपये

PR
PR
मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याचे दिवस खरोखरच आलेत असे वाटते. याचे कारण नटरंगच्या कमाईचा ताजा आकडा. नटरंगने आतापर्यंत ७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचा विक्रम करणारा नटरंग हा पहिलाच चित्रपट आहे. झी टॉकिजची प्रस्तुती असलेला हा चित्रपट सध्या १४० चित्रपटगृहात दाखवला जात आहे ज्यामध्ये ४० प्रिंट आणि अन्य चित्रपटगृहात यूएफओच्या माध्यमातून याचे प्रदर्शन केले जात आहे. यापूर्वी झी टॉकिजच्याच साडे माडे तीनने पाच आठवड्यात २ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या दोन चित्रपटांपूर्वी माहेरची साडी चित्रपटाने तीन महिन्यात सहा कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. नटरंगने सात कोटींची कमाई फक्त पाच आठवड्यात केली आहे, ते ही मराठी चित्रपटांसाठी तिकिटांचे दर कमी असताना.