1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (16:43 IST)

आला होता दिवस "श्री"स्थापनेचा

आला होता दिवस "श्री"स्थापनेचा,
स्वागत केलें गणरायाचे, घालविला दिन आनंदाचा,
आली पंचमी चा दिवस, बोळविलें गणपती ला,
रोखीला श्वास, श्री गजाननाने त्यजिले शरीराला,
समाधिस्त जाहले गजानन, शेगाव नगरी,
हळहळले सारे भक्त, हुरहुर अंतरी,
परी निष्ठा अन भक्ती जर असेल अपरंपार,
पावते आजही ते परब्रह्म,  देई साक्षात्कार,
वास तयांचा असें तिथं अजूनही येते प्रचिती,
विश्वास मात्र असावा लागतो, मिळते शांती !
.....अश्विनी थत्ते