शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

कसबा गणपती

कसबा गणपती
'शिक्षणाची पंढरी' म्हणून ओळख असणारे पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवतच. शिवाजी महाराजांच्या वाडा अर्थात शनिवार वाड्यालाच लागूनच कसबा गणपतीचे प्राचीन भव्य व देखणे मंदिर आहे. शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला होता. जिजाबाईंच्या हस्ते कसबा गणपतीची स्थापना केली होती. आधी मूर्ती अतिशय लहान होती मात्र शेंदूराने न्हाऊन निघालेली कसबा गणेशाची मूर्ती तीन फूट उंचीची झाली आहे.