सांगली लोकसभा निवडणूक

sangli
मुख्य लढत : (भाजप) विरुद्ध (स्वाभिमानी पक्ष) विरुद्ध

गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)

संजयकाका पाटील हे १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. संजयकाका पाटील हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र २०१४ च्या निवडणूकाआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. संजयकाका पाटील यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यामान खासदार प्रतीक पाटील यांचा पराभव करत ते विजयी झाले.

लोकसभा निडवणुक २०१९ साठी जागावाटप करताना प्रदेश काँग्रेसने ही जागा थेट मित्रपक्षाला सोडली. काँग्रेसच्या कोट्यातून ही जागा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयाचे तीव्र पडसात सांगली काँग्रेसमध्ये उमटले. त्यानंतर वसंत दादा घराण्याने बंड केले. माजी खासदार प्रतिक पाटील यांच्या रुपात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षांतर्गत हे बंड थोपविण्यासाठी विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास प्रवृत्त करण्यात आले. आणि तात्पुरता तोडगा काढण्यात आला. त्यामुळे इते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार हा केवळ आणि केवळ नावालाच असून, तो पूर्णपणे काँग्रेसचाच आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.

विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला ...

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; ...

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; पाकिस्तानी कंपनीचा दावा
टिक-टॉकवरील वादग्रस्त व्हिडिओंमुळे आता लोक भारतीय अॅप मित्रो (Mitron) कडे वळत आहे. एक ...

राज्यात ३३ हजार १२४ रुग्ण अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात ३३ हजार १२४ रुग्ण अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले ...

विक्रमी संख्येने कोरोना बाधितांना डिस्चार्ज

विक्रमी संख्येने कोरोना बाधितांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या ...