शिवजयंती २०२०, न्यूयॉर्क

shiv jayanti
Last Updated: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (20:05 IST)
जयंती न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासात प्रचंड उत्साहात साजरी
• छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजनः अमेरिकेतील 7 वर्ष शिवजयंती साजरी करत आहेत - ह्यावर्षी भारत सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्यासंयुकत विद्यमाने
• कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक असे प्रयोग सादर केले आणि तबला व विणा सह सांस्कृतिक संगीत (अल्बनी ग्रुप तर्फे सादर)

मुख्य पाहुणे:
श्री भुपेशजी बाघेल (मुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य)
मुख्यमंत्र्यानी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली. छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगड मध्ये राहतात असे सांगत महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचे सांगितले.

सातासमुद्रापार आपण इतक्या मोठया प्रमाणावर शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी छत्रपती फाऊंडेशन व Consulate of India in New York यांचे कौतुक केले.

मनोज शिंदे, उद्योगपती, CEO tCognition Softwares
गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक अमेरीकन कॉर्पोरेट जगतात आज भारतीय व्यक्ती CEO सारख्या उच्चपदांवर आहेत. मराठी मुला-मुलींनी व्यवसायात उतरण्याचे आवाहन करीत आज कार्यक्रमात करिअर व उद्योजक मार्गदर्शन शिबिराचे महत्व सांगितले.
*ए के विजयकृष्णन, सामाजिक कार्य कॉन्सुल, भारतीय वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क *
भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या तर्फे सामाजिक उपक्रमांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
शिवजयंती साजरी करणारी अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला व सह-आयोजक छत्रपती फाऊंडेशनच्या भावी कार्यक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
shiv jayanti
करिअर व उद्योजक मार्गदर्शन:
श्री श्याम कुमार , CEO of I&I Softwares
श्री अमित शोरेवाला, President of ASA College in NY and Florida
श्री किशोर गोरे, Vice President at Global Infotec Solutions
श्री गौरव दळवी, समन्वयक
यावेळी छत्रपती फाऊंडेशन चे अनेक वर्षांपासून सदस्य असलेले व विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला:
श्री महेंद्र सिनारे, owner, 200-rooms hotel(Tennessee)
श्री रोहन डाबरे, Mumbai Rasoi Restaurant (Rhode Island)
कु अलिशा मर्चंट, Miss Bharat New York 2019

दूतावासातर्फे श्री रामास्वामी मुरुगेसन ह्यांनी पासपोर्ट, व्हिसा व NRI योजनांबद्दल माहीती दिली तर मुग्धा धैसास ह्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली.
shivaji Newyork
• न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातून आलेल्या शिवभक्तांनी हॉल भरगच्च भरला होता .
छत्रपती फाऊंडेशनने त्याच वेळी डेन्व्हर (कोलोरॅडो) व डलास (टेक्सास) येथे सुद्धा शिवजयंती आयोजित केली.
• छत्रपती फाऊंडेशन एक तरुण आणि विद्यार्थी संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी महाराजांच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रचारास समर्पित आहे.
• जिजाऊ जयंती, आंबेडकर जयंती, शाहू जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादीसह इंडिया डे परेड यासारखे उपक्रम वर्षभर राबविले जातात.
• कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विनोद झेंडे, सचिव गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बनी), अभिनव देशमुख (जॉर्जिया ), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यूजर्सी), श्रद्धा सहाणे (न्यूजर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्टिकट) ह्या पदाधिकाऱयांसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
• कार्यक्रमास क्रिकेट्स्टार अजिंक्य रहाणे, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार विनायक मेटे ह्यांनी विडिओ संदेशाद्वारे सदिच्छा दिल्या.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी ...

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी देणगी जमा
या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टसाठी मोठी देणगी जमा ...

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले
जपानमधली करोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे. ...

टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच 'ही' वेळ आली

टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच 'ही' वेळ आली
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच ही ...

UN ने केले सावध, कोरोनाच्या काळात वाढू शकतात सायबर गुन्हे

UN ने केले सावध, कोरोनाच्या काळात वाढू शकतात सायबर गुन्हे
कोरोना विषाणूंच्या काळात सायबर गुन्हेगारी वाढत आहे आणि दुर्भावनापूर्ण ईमेल मध्ये 600 ...

राज्य माहिती आयोगा ई-मेलद्वारे सुनावणी करणार

राज्य माहिती आयोगा ई-मेलद्वारे सुनावणी करणार
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य माहिती आयोगाने आता नागरिकांसाठी पुढाकार घेत ...