शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सर्वात मोठी कंपनी पार्ले बिस्कीट करणार दहा हजार कर्मचारी कपात

सर्वात मोठी बिस्कीट कंपनी पार्ले प्रोडक्ट्स 10,000 कर्मचारी कमी करणार आहे. देशातील बाजारातील आर्थिक मंदी यासाठी काआहे त्यामुळे बिस्कीट विक्री मोठ्या प्रमाणात घटली असे कंपनीने सांगितले आहे. बाजारात होणारी भिस्कीत  विक्री मोठ्या प्रमाणत घटल्याने कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागतोय, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर जाणार आहेत. 
 
100 किलोपेक्षा कमी म्हणजे 5 रुपयांखालील बिस्कीट पॉकेटवरील जीएसटी कमी करावा, अशी मागणी सरकारकडे कंपनीने केली आहे. मात्र जर सरकारने हा निर्णय न घेतल्यास विविध ठिकाणचे आठ ते दहा हजार कर्मचारी कमी करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही  पर्याय राहणार नाही, कारण, मंदीमुळे कंपनीवर आर्थिक  बोजा पडत आहे, अशी माहिती पार्ले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी दिली आहे. 
 
देशात 10 हजार कोटी रुपयांची विक्री असलेल्या पार्लेकडून प्रसिद्ध पार्ले जी, मोनॅको, मारी ब्रँडचीही बिस्कीट उत्पादित करण्यात येतात. यामध्ये कंपनीकडून एक लाख कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो, तर देशात कंपनीचे स्वतःचे 10 प्लांट्स असून 125 थर्ड पार्टी निर्मिती सुविधा आहेत. पार्लेचे निम्म्यापेक्षा जास्त ग्राहक हे ग्रामीण भारतात आहेत. तर दुसरी मोठी कंपनी ब्रिटानिया देखील आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात अनेकांच्या नोकऱ्या जातील असे चित्र आहे.