आई हेच आपले खरे दैवत

mothers day wishes
Last Modified बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (17:53 IST)
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द किती सहजपणे आपण उच्चारतो पण त्या शब्दामागे दडलेली असते ती फक्त आणि फक्त माया, वात्सल्य.
आई ही खरं तर शब्दात मांडणे फार कठीण आहे. असे म्हणतात की 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' हे तंतोतंत खरे आहे.

आपल्या जवळ सर्व काही आहे संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे पण डोक्यावर मायेचा हात फिरवणारी आईच नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. बाळाला जन्म देणारी आई ही देवाचे रूप आहे. असे म्हणतात की देव सर्वत्र येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.

आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेणारी, कोणाला काय हवं काय नको, सर्वांचे मन जपणारी, त्यांच्याकडे लक्ष देणारी आई सर्वांसाठी झटते, राब राब राबत असते.

सर्वांसाठी चांगले अन्न शिजवते. मुलांना संस्काराची शिदोरी देते. कुटुंबीयांचा मागे खंबीरपणे उभारून आलेल्या परिस्थितीला तोंड देणारी सुद्धा आपली आईच असते.

आई ही बाळाची पहिली गुरु मानली जाते. बाळाला योग्य मार्ग दाखवते आणि वेळो-वेळी आपले मार्गदर्शन करते. मुलांच्या चुकीला सुधारते. शिस्तबद्धता, विश्वास ठेवणं, सगळ्यांचा आदर करणं मग तो मोठा असो किंवा लहान, शिकवते आणि समाजात एक चांगले व्यक्तिमत्त्व घेऊन जगणे शिकवते. वेळ पडल्यास मुलांना चांगले घडविण्यासाठी तिला आपले कर्तव्य पार पडताना कठोर बनावे लागतं.
आई ही एका वृक्षाप्रमाणे असते जी आपल्याला मायेची सावली देते. आपल्याला काही दुखापत झाली किंवा आपण अडचणीत असलो की आपल्या ओठांवर सर्वात पहिले नाव येते ते आईच असते. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यावर आईच दिवसरात्र एक करून त्यांची काळजी घेते. आपल्या मुलांना घडविण्यात आईचा मोलाचा वाटा असतो. याचे प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला आई जिजाऊने शिवाजी महाराजांना दिलेल्या शिकवणी ने दिसून येते. शिवबा यांना स्वराज्याची शिकवण आई जिजाऊ यांनीच दिली होती. महात्मा गांधी यांच्या मनात देखील सत्याग्रहाचा धडा त्यांच्या आईनेच शिकवला. आचार्य विनोबांना भूदानाची कल्पना त्यांच्या आईच्या शिकवणीतूनच मिळाली.
आई अशी व्यक्ती आहे जी अगदी निस्वार्थपणे आपल्या मुलाचे संगोपन करते. त्यांना चांगले घडविण्यासाठी धडपड करत असते आणि ती पण कोणत्याही परतफेडाची अपेक्षा न बाळगता. आई हा मायेचा सागर आहे त्यामधून आपल्या मुलांसाठी माया ओसंडून वाहत असते. या जगात आईची तुलना कोणाशी ही करता येणं अशक्यच आहे आणि तिची तुलना कोणाशी करूही नये.

असे म्हणतात की मुलांचे यश आणि अपयश त्यांच्या मिळालेल्या संस्कारावर अवलंबवून असत. पण

आजच्या जगात अशी मुलं देखील आहेत जी लहान पणी तर चांगली संस्कारी असतात. पण मोठी झाल्यावर आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना ओझं समजतात आणि काही स्वार्थी लोक असे ही असतात जे आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईची पाठवणी थेट वृद्धाश्रमात करतात. असे करणं सरासर चुकी चे आहे. असे अजिबात करू नये. आपण आपल्या वृद्ध आईची सेवा करावी. कारण तिने जे आपल्यासाठी केलेले आहे त्याचे ऋण आपल्यासाठी फेडणे या जन्मात तरी अशक्य आहेत. पण काही मुलं पैशाच्या रूपाने ते ऋण परत फेडू बघतात. पण मुलांना हे माहिती नसत की म्हातारपणी आईला कसलीही अपेक्षा नसते. ती फक्त आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेण्यासाठी आसुसलेली असते.

आपल्याला आपल्या आईचा सांभाळ करायला हवा. कारण कोणत्याही धनसंपत्तीची तिला अपेक्षा नसते. ती भुकेली असते ती फक्त प्रेमाची. आपल्याला आपल्या आईला आदर द्यायलाच पाहिजे. कारण आई नाही तर आपले अस्तित्वच नाही. आई नाही तर काहीच नाही. कारण आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. वात्सल्य मूर्ती असणाऱ्या जगातील सर्व मातांना कोटी-कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले ...

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर सभा घेणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असताना

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे ...

नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन ...

नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी  १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम
नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ...

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या ...