स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल

Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (10:54 IST)
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची कॉग्रेस अधिवेशनाचे (१९३१) अध्यक्ष पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ झाला. लहानपणापासूनच संघटन कौशल्य असणार्याज पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या वडिलांकडून पिढीजात मिळाली होती. त्यांचे वडील जवेरभाई राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर स्वातंत्र्याची पहिली लढाई लढले होते.
वल्लभभाई उच्च शिक्षणासाठी १९१० साली इंग्लंडला गेले. १९१३ मध्ये त्यांनी वकिलीस सुरुवात केली. गांधीजींनी केलेल्या आवाहनाने १९१७ मध्ये ते गुजरात सभेचे सचिव या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. १९१८ मधील खेडा सत्याग्रहात गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून ते कार्यरत झाले आणि वकिलीला रामराम ठोकला.

वल्लभभाई पटेल यांनी १९२८ मधील बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. येथून त्यांना 'सरदार' ही उपाधी मिळाली. मिठाच्या सत्याग्रहात पकडले जाणारे ते एक प्रमुख राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कराची मधील कॉग्रेस अधिवेशनात गांधी-आयर्विन करार मांडला. पटेल यांनी तीव्रपणे स्वातंत्र्यासाठी आवाज उठविल्याने ते जानेवारी १९३२ ते मे १९३३ पर्यंत गांधीजींसह १६ महिने येरवडा तुरुंगात राहिले.

यानंतर एक वर्षासाठी ते नाशिकच्या तुरूंगात राहिले. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना पुन्हा अटक झाली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्याे सरदार यांना देशे स्वातंत्र्य झाल्यानंतर गृहमंत्रीपद देण्यात आले. भारतात सामील होण्यास नकार देणार्या
संस्थानांवर सैनिक कारवाई करून त्यांनी आपल्यातील पोलादी पुरूष दाखवून दिला. १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांचा मृत्यू झाला. सरदार पटेल यांना मृत्यूनंतर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'बहुसंख्यांक आपली जबाबदारी ओळखत नसतील, तर हे देशाचे दुर्भाग्य असेल. जर मी अल्पसंख्याक समुदायाचा असतो तर हे विसरून गेलो असतो की मी अल्पसंख्याक आहे.' हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. देशाची एकता आणि स्वातंत्र्याचे रक्षण त्यांचे जीवनाचे लक्ष्य होते. नाविकांच्या विद्रोहाला देखिल त्यांनीच इशारा देऊन शांत केले. घटनासभेत देखिल देशाची एकता भंग पावू नये याची दक्षता त्यांनी घेतली. देशाच्या एकतेसाठीच हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. याबरोबरच सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून लयास गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी केले.
(भारत सरकारतर्फे १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या 'सरदार पटेल' या पुस्तकाच्या आधारे)


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला
इन्स्टंट मेसेजिंग अॅणप व्हॉट्‌सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत दाखल याचिकेवर दिल्ली ...

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी ...

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी भारतीय
कॅलिफोर्नियामधील रहिवासी असलेल्या आदित्य सिंगवर गंभीर गुन्ह्याखाली विमानतळाच्या ...

फावल्या वेळात काय करायचं

फावल्या वेळात काय करायचं
महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि ...

जो बायडन शपथविधी : 'इनॉगरेशन' म्हणजे काय? कधी होणार हा ...

जो बायडन शपथविधी : 'इनॉगरेशन' म्हणजे काय? कधी होणार हा सोहळा?
अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला 'इनॉगरेशन' म्हटलं जातं. खरंतर या ...

Ind Vs Aus Test : टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकली; ऋषभ ...

Ind Vs Aus Test : टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकली; ऋषभ पंतची धडाकेबाज खेळी
ऋषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेवियावर तीन ...