1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (14:56 IST)

BOI Officer Recruitment 2020: बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदांवर होत आहे नियुक्ती

BOI Officer Recruitment 2020: बँक ऑफ इंडिया ने विविध पदांसाठी अर्ज काढले
बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदांवर होत आहे नियुक्ती
 
बँक ऑफ इंडिया (BOI) ची विविध पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया बुधवार 16 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 सप्टेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी BankofIndia.in.in वर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. 
 
एकूण रिक्त जागा - 
214 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम राबविली जात आहे, या मध्ये 4 पद अर्थशास्त्रज्ञांंसाठी , 2 पदे सांख्यिकीविज्ञानासाठी, 9 पदे रिस्क मॅनेजर्ससाठी, 60 पदे क्रेडिट एनालिस्टसाठी, 79 पदे क्रेडिट ऑफिसरची, आयटी साठी 30(फिनटेक), 12 पद डेटा विश्लेषकांसाठी, 12 पद आयटी साठी, 8 पद (इन्फो सेक्युरिटी), आणि 10 पद टेक मूल्यांकनासाठीचे असणार.
 
अर्ज फी - 
साधारण सामान्य वर्ग उमेदवारांसाठी 850 रुपयांची अर्ज फी भरावी लागणार.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क 175 रुपये आहे.
 
परीक्षेचा नमुना -
ऑन लाइन परीक्षेत 175 प्रश्न असणार. उमेदवारांना 150 मिनिटात उत्तर द्यावे लागणार. परीक्षेत इंग्रजी भाषेचे 50 प्रश्न आणि बँकिंग उद्योगाबद्दलचे सामान्य जागरूकता असणार. उर्वरित प्रश्न व्यावसायिक ज्ञान विभागातील असणार.
 
बँक ऑफ इंडियाचे अधिकारी भरती 2020 : महत्त्वाची माहिती
संस्थेचे नाव - बँक ऑफ इंडिया (BOI)
जाहिरात क्रमांक प्रकल्प क्रमांक - 2020 - 21/2 
पद - चतुर्थ श्रेणी पर्यंतचे अधिकारी
एकूण रिक्तता - 214
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची तारीख  - 16 सप्टेंबर 2020 पासून
ऑन लाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2020 
अधिकृत संकेत स्थळ किंवा अधिकृत वेब साईट - bankofindia.co.in
 
बँक ऑफ इंडिया ने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिलेली आहे.
 
अधिकृत सूचनेनुसार, "पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज उमेदवारांच्या संख्येच्या आधारे/ ऑनलाईन परीक्षा व / किंवा वैयक्तिक मुलाखत/ जीडीच्या माध्यमाने निवड होईल. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास, ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीचे वॅटेज अनुपात 80:20 असणार. उमेदवारांचे एकत्रित अंतिम गुण ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या एकूण गुणांवर असणार(बँकिंग उद्योग आणि व्यावसायिक ज्ञानाच्या पात्रासाठी विशेष संदर्भांसह सामान्य जागरूकता मध्ये मिळालेले गुण ) आणि मुलाखत. अंतिम निवडीसाठी उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत दोन्हीमध्ये योग्य असावं लागेल.