पितृदिन विशेष : बाप

ज्यांनी जन्म दिला ते
माता नि पिता।
मीच जन्मदाता झाले जेव्हा।।1।।
तेव्हाच कळाले झाडा
विना छाया।
बापा विना माया नसे जगी।।2।।
आणिक कळाले पचवितो ताप
त्याचे नाव हेची सत्य।।3।।
बाप ज्या घरात त्या घरा महत्त्व
आणिक अस्तित्व
जनामध्ये ।।4।।
मुलांनी बापाचा करावा आदर
तो एक ईश्वर मुलासाठी।।5।।
dad

आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली आहे. ‘आई’हा शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. तसे पाहिले तर बापच आईला अर्थ देतो. घरातल्या अर्थार्जनापासून ते घराला अर्थ म्हणजे महत्त्व इथपर्यंत अर्थ देण्याचं काम बाप करतो. आणि वडिलांची माया आपल्यावर किती असते, त्याला मोजमाप नाही. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचं मोठं केलेलं असतं. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्र न् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती, बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही.

जोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही. मुलाचे अपराध पोटात घालून त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तचं नाव बाप. या जगातल्या प्रवेशापासून ते या अवस्थेपर्यंत बापाने घेतलेल्या त्रासाचा विचार करता बापाला परमेश्वर समजून आदर करावा. एवढं जरी नाही जमलं तरी चालेल कमीत कमी त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवू नये. यासाठी बापानेही मुलं मोठी झाल्यावर आपण लहान व्हावं लागतं तेव्हाच मेळ बसतो.

गोविंद काळे


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

चमचमीत आणि चविष्ट शाही पनीर

चमचमीत आणि चविष्ट शाही पनीर
शाही पनीर बनविण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे लांब चौरस तुकडे करून तुपात तळून पाण्यात टाकून ...

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे
आज आम्ही आपणास सांगणार आहोत अश्या 5 लक्षणांबद्दल जे शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला ...

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात
स्मार्ट फोनच्या जगात मागील 10 वर्षात मोठा बदल झाला आहे. आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत ...

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन
शरीराच्या प्रत्येक भागावर लठ्ठपणा वाईटच दिसतो. मग तो चेहर्‍यावरच का नसे. बऱ्याच वेळा काही ...

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य
आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती मुलांना पाहिजे. प्राण्यांचे ...