स्ट्रॉबेरी नरम होईस्तोवर चांगले उकळून घ्या. मऊ झाल्यानंतर त्यांना थंड होऊ द्या. नंतर त्या चांगल्या प्रकारे फेटून पेस्ट तयार होईल. नंतर त्यात मध मिसळा. नंतर ती पेस्ट चेहर्यावर 10 मिनिटे लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवून टाका.
सामग्री:- 2 मध्यम आकारातील पिकलेली केळी, दोन मोठे चमचे मध व जवचे पीठ.
विधी:- केळीची साल काढून हाताने चांगले कुसकरून घ्या. चांगले मऊ पेस्ट झाल्यानंतर मध व जवचे पीठ त्यात मिसळा. नंतर ती पेस्ट 10 मिनिटे चेहर्यावर लावून ठेवा. थंड पाण्याने चेहरा धूवून घ्या. चेहरा सतेच होऊन चेहर्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.