मॉर्निंग वॉक करा; फिट रहा
वयाच्या चाळिशीतही तो एका नवयुवकासारखाच दिसत होता. एके दिवशी कार्यालयात होणार्या चाचणीत त्याचे ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसले. डॉक्टरांनी त्याला औषध दिली. शिवाय खाण्यापिण्यावर नियंत्रणाचा आणि सकाळी फिरण्याचा सल्लाही दिला.
अनपेक्षितरित्या आलेल्या या शारीर धोक्याने तो घाबरून गेला आणि शांत शांत राहू लागला. पण दोन-तीन महिन्यांनंतर पुन्हा चाचणी केली तेव्हा त्याचे ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचे निरीक्षण केले तेव्हा ते एकदम नॉर्मल होते. डॉक्टरांनी त्याला औषधे बंद करण्याचा सल्ला दिला. पण रोज कमीत कमी 40 मिनिटे मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला दिला.
पूर्वी रोज सकाळी फिरायला जाणे आवडीचा भाग होते. पण आज ती गरज बनली. वाढता ब्लडप्रेशर, शुगर, हृदयासंबंधित आजार, डिप्रेशन, निद्रानाश यासारख्या अनेक आजारांवर मॉर्निंग वॉकचा खूप फायदा होतो. डॉक्टरही दहामधून सात जणांना कमीत कमी 40 मिनिटे चालण्याचा सल्ला देतात.
आरोग्य चांगले राहण्यासोबतच मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती, तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते.
मॉर्निंग वॉकचा पूर्ण फायदा मिळविण्यासाठी ताठ चालावे. चालताना तोंड बंद असावे तसेच श्वासोच्छवास नाकानेच करावा. मॉर्निंग वॉकमुळे दिवसभर प्रसन्न वाटते. स्वभावात परिवर्तन होऊन सकारात्मक भावना वाढीस लागते. पती-पत्नी सोबतच फिरायला जात असतील तर त्यांचे नाते अधिक गहिरे होते. परस्पर विश्वास वाढून एकमेकांना सांभाळून
घेण्याची भावना वाढते.
समूहाने फिरायला जात असाल तर आपापसातील गमती जमती, हसणे यामुळे मानसिक स्वास्थ सुधारते. हसण्यामुळे रक्त प्रवाहाची गती वाढते. डोकेदुखीची समस्या कमी होते. सकारात्मक भावनांचा संचार होतो. शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढते.
तज्ज्ञांच्या मते आशावादी व्यक्तीला तणाव जाणवत नाही. ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, वाढते वजन या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मॉर्निंग वॉकला अवश्य जा.
अनपेक्षितरित्या आलेल्या या शारीर धोक्याने तो घाबरून गेला आणि शांत शांत राहू लागला. पण दोन-तीन महिन्यांनंतर पुन्हा चाचणी केली तेव्हा त्याचे ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचे निरीक्षण केले तेव्हा ते एकदम नॉर्मल होते. डॉक्टरांनी त्याला औषधे बंद करण्याचा सल्ला दिला. पण रोज कमीत कमी 40 मिनिटे मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला दिला.
पूर्वी रोज सकाळी फिरायला जाणे आवडीचा भाग होते. पण आज ती गरज बनली. वाढता ब्लडप्रेशर, शुगर, हृदयासंबंधित आजार, डिप्रेशन, निद्रानाश यासारख्या अनेक आजारांवर मॉर्निंग वॉकचा खूप फायदा होतो. डॉक्टरही दहामधून सात जणांना कमीत कमी 40 मिनिटे चालण्याचा सल्ला देतात.
आरोग्य चांगले राहण्यासोबतच मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती, तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते.
|