1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

शीतपेये, फळांच्या रसाने गाठींची शक्यता

शीतपेये
NDND
साखरेचे प्रमाण जास्त असणारी शीतपेये व फळांचा रस पिणार्‍यांमध्ये गाठी होण्याची शक्यता जास्त असते. विशिष्ट प्रकारच्या अल्कोहोलपेक्षाही सॉफ्टड्रिंकमुळे गाठींचा धोका जास्त असतो.

एका नव्या संशोधनात ही बाब आढळली आहे. या गाठी सुजून त्यामुळे खूप वेदना होण्याची शक्यता आहे. रक्तात युरीक एसिडचे प्रमाण जास्त झाल्याने युरीक एसिडचे कण सांध्यांपाशी साठून या गाठी होतात.

व्हॅंक्युअरच्या ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील ह्योन के. चोई व हर्वड मेडिकल स्कूलचे गॅरी चर्चन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनात ही बाब आढळून आली. साखरेचे प्रमाण जास्त असलेली सॉफ्ट ड्रिंग व फ्रुक्टोज ( साखर व कायबोहायड्रेड्स यात असतात. त्यामुळे युरीक एसिडचे प्रमाण वाढते.) यांच्यामुळे होणार्‍या गाठींचा संबंधा यांनी शोधून काढला. त्यासाठी चाळीस वर्षांवरील ४६ हजार जणांची तपासणी करण्यात आली. यांना त्यापूर्वी बारा वर्षांपर्यंत गाठी झालेल्या नव्हत्या. विविध सॉफ्ट ड्रिंक व फळांची पेये यांनी किती घेतली त्यानुसार त्यांचा अभ्यास करण्यात आला.
About Writer
एएनआय