1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

खा, पण जरा जपून !

NDND
खाण्यापिण्यासंदर्भातील छोट्या छोट्या गोष्टी फारच महत्त्वाच्या असतात. त्यांचे पालन केल्यास बराच मोठा फरक पडू शकतो. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी त्याकडे लक्ष देणे म्हणूनच आवश्यक ठरते.

जेवण कपड्यांसारखे असते. प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार, रंगानुसार आणि प्रकृतीनुसार वेगवेगळे कपडे शोभतात. एकाला जे शोभतं ते आपल्यालाही शोभायला पाहिजे, हा हट्ट चालत नाही. जेवणाच्या बाबतीतही तसेच आहे.

NDND
खाण्याच्या प्रक्रियेत तोंडाला जपणे आवश्यक आहे. तोंड म्हणजे केवळ दात नव्हे. तर संपूर्ण तोंडाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागावरही पडतो. दातांची नियमित स्वच्छता केल्यास ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

आपला रक्तगट कोणता आहे, यावरही आपल्याला कोणते अन्न सूट करते ते अवलंबून असते. काही विशिष्ट रक्तगटाच्या लोकांना काही विशिष्ट अन्न खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. थोडक्यात आपली एलर्जी आपल्याला माहित हवी.

NDND
तणावामुळे खाण्यावर परिणाम होतो. कमी खाण्यामुळे तब्बेत खालावतो हा एक परिणाम झाला. पण याच्या उलटही होऊ शकते. तणावात खूप खाल्ले जाऊन लठ्ठपणाही येऊ शकतो.

एका व्यक्तीची पचनक्रिया दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्याला जे पचतं ते तुम्हाला पचू शकतं असं नाही. त्यामुळे दोघांचा आहार वेगळा असू शकतो.