हसत राहिल्याने शरीर आणि मनात उत्साहाचा संचार होतो. मनापासून हसणे तर एखाद्या औषधाप्रमाणेच आहे. हे एका उत्तम टॉनिकचे काम करते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी जागोजागी हास्य क्लब बनविले जात आहेत. बोलताना जितका ऑक्सिजन घेतला जातो, त्यापेक्षा सहापट अधिक ऑक्सिजन हसताना घेतला जातो. म्हणजे नुसत्या हसण्यातून शरीराल जास्त ऑक्सिजन मिळतो.
मानसोपचारतज्ज्ञदेखील तणावग्रस्त व्यक्तींना सतत हसत राहण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते हसताना तुमचा मेंदू विचार करू लागतो, की तुम्ही आनंदात आहात. ही प्रक्रिया पूर्ण शरीरात प्रवाहीत होते. आणि तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागते. तुम्ही हसणे सुरू करतात तेव्हा तुमच्या शरीरात रक्ताभिसरण तीव्र गतीने होतो. तणावातही हसत राहण्याची क्षमता असेल तर दु:खही कमी वाटायला लागतात. हसण्यामुळे इतरही फायदे होतात...
* हसताना राग येत नाही. * हसत राहिल्याने आनंद मिळतो. * शरीरात नव्या स्फूर्तीचा संचार होतो. * हसण्याने मनात उत्साहाचा संचार होतो. * ब्लडप्रेशर कमी होते. * हसणे दु:ख दूर करते. * हसण्याने शरीरासोबतच मेंदूचाही व्यायाम होतो.
हसणे-हसविणे आपल्या सवयीमध्ये सामील करा आणि मग पाहा तणाव तुमच्या आसपासही दृष्टीस पडणार नाही. त्यासोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहील.
|