पान खा, पण सवय नको!
|
पान फक्त मुखशुद्धसाठीच खातात, असे नाही, देवपूजेतही पानाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात प्रत्येक पुजेत पानाचा उपयोग होतोच. आकार, स्वाद, आणि उंची प्रमाणे याचे प्रकार पडतात. पान हा प्रचलित शब्द असला तरी, याला मराठीत विडा या नावाने ओळखले जाते. राज्यांच्या खासीयतीप्रमाणे पानांची चव बदलते. यात बनारसी, त्यातही मीठा, तीखा, बगैर सुपारी, साधा मसला, गुलकंद, आणि तंबाखू टाकूनही त्याचे अनेक प्रकार पडतात. लिहायला गेलं तर जागा कमी पडेल एवढे पानांचे प्रकार आहेत.
पानाचे फायदे व औषधी उपयोग
पानाने पाचनशक्ती वाढते आणि मंदाग्नी, बद्धकोष्ट दूर होतो.
गळ्यासंबंधी विकारांवर पान फायदेशीर आहे. त्याने आवाजसुद्धा साफ होते
तोंडाची चव, मळमळ अशावेळी पान जरूर खावे.
हृदयगतीला नियंत्रित ठेवतो.
पानामुळे पोटातले कृमी मरतात.
सर्दी-खोकल्यात पानाचा रस मधासोबत घेतल्याने फायदा होतो.
हिरड्यांना पायरिया नावाच्या रोगाने वाचवून मजबूत बनवतो.
पानाचे होणारे नुकसान
विड्याच्या पानाला जर्द्याबरोबर (तंबाखू) खाल्ल्यास पानातील गुण नष्ट होतात.
विडा नेहमी जेवण झाल्यानंतरच खायला पाहिजे. रिकाम्या पोटी पान खाणे चांगले नसते.
जास्त पान खाल्ल्यास वा त्याची सवय असल्यास त्रास होतो. तोंड किंवा डोळ्यांसंबंधी रोग होण्याची शक्यता असते.
पानासोबत जास्त कात टाकल्यास श्वसनाचा विकार होण्याची शक्यता असते.
ज्यांना ताप, दातांचे विकार असतील त्यांनी पान खाणे शक्यतो टाळावे.
हे उष्ण व पित्तकारक आहे. मुलांना, गर्भवती महिलांना, गरम प्रवृती असणार्या लोकांना हे हितकारक नसते.
