मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > लेख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुले ठरतात दुःखाला कारण

dukh
ND
माणसाचं आनंदनिधान कशात असतं? अर्थातच लग्न, पैसा आणि मुलांमध्ये असंच तुमचं उत्तर असेल. पण तुम्ही चुकीचा विचार करताय? लग्न करून, भरपूर पैसा मिळवून मुलांमध्ये तुम्ही सुख शोधू पहात असाल तर खालची बातमी नीट वाचा. सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडलेला नाही. तरीदेखिल हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॅनियल गिल्बर्ट यांनी तो बर्‍याच अभ्यासाअंती शोधून काढला आहे.

गिल्बर्ट यांच्या मते विवाहित लोक अविवाहितांपेक्षा आनंदी असतात, हे आकड्यांनिशी सिद्ध झालंय. भलेही मग ते सध्या एकटे, घटस्फोट घेऊन रहात असतील. शिवाय विवाहित लोक जास्त दिवस जगतात. त्यांचे वैयक्तिक आर्थिक उत्पन्नही जास्त असते. शिवाय सेक्सचा अनुभव असल्याने तो ते एंजॉयही करतात. म्हणूनच कोणत्याही अंगाने पाहिलं तर विवाहित मंडळी सुखी असतात.

त्याचवेळी पैशांच्या सहाय्यानेसुद्धा सुख विकत घेता येते. पण मर्यादित. लोकांना जेवढं वाटतं तेवढे सुख नक्कीच घेता येत नाही.

पैशामुळे भरपूर सुख विकत घेता येईल. म्हणजे तुम्हाला सुख देणारी साधने तुम्ही विकत घ्याल. पण जेवढे अधिक पैसे खर्च कराल, सुख तेवढे कमी कमी होत जाईल. एक वेळ तर अशी येईल, की तुम्हालाही वाटेल की तुमच्या आनंदासाठी पैसा फार काही करू शकत नाही. पण अर्थात तुमच्याकडे खूप पैसा आहे, म्हणून तुम्हाला वाईट वाटेल असेही नाही. तुम्हाला भरपूर पैसे मिळाले तरी तुम्ही निराश नक्कीच होणार नाही, असेही गिल्बर्ट नमूद करतात.

मुले म्हणजे संसारवेलीवरची फुले असे वाटते. पण आपल्या सुखावर मुलांचा नकारात्मक परिणाम होतो. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण जेवढी जास्त मुले तेवढे जास्त दुःख, असे गिल्बर्ट यांचे अभ्यासाअंती झालेले मत आहे.

'मुलाच्या बाबतीतली 'गुड न्यूज' समजल्यानंतर घरांत आनंदी आनंद होतो. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर मात्र तो टिकत नाही.' हे अमेरिकेत व युरोपात केलेल्या अनेक सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्याला पुष्टी देताना गिल्बर्ट म्हणतात, मुले बारा ते सोळा या पौगंडावस्थेत पोहोचतात. तेव्हा तर आनंदाची पातळी खूपच खाली आलेली असते. मुले होण्याआधी आनंदाचे एक टोक गाठलेले असते तर मुलगा पौगंडावस्थेत पोहोचल्यानंतर आनंद फारच कमी होतो.

मग माणूस पुन्हा एकदा सुखाच्या एका विशिष्ट पातळीवर केव्हा येतो, असे विचारले असता मुले मोठी होऊन दूर जातात, त्यावेळी सुख पुन्हा एका स्थिर पातळीवर येते, गिल्बर्ट स्पष्ट करतात.
आणखी
मुलांना लावा वाचनाची सवय!
बहुगुणी संत्रे
अशी घ्या 'ब्युटी स्लिप'!
पान खा, पण सवय नको!
मॉडर्न 'ममा' मुळे मुलांचे हाल
खवय्यांना होऊ शकतो कँन्सर