उन्हाळ्यात व्यायाम टाळू नका!
|
* उन्हाळ्यात अतिरिक्त व्यायम करू नये. नेहमीइतकाच व्यायाम करावा.
* व्यायामाने स्नायू ताणले जाऊन शरीराचे तापमान वाढते. परिणामी घाम बाहेर पडून शरीराचे तापमान नियंत्रित रहाते. या दिवसांत घाम जास्त येतो म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.
* उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी व्यायाम करणे सर्वांत उत्तम. कारण सकाळी तापमान कमी असते.
* या दिवसांत व्यायामामुळे शरीरातले पाणी कमी होणे, स्नायू ताणले जाणे, थकवा, डोकेदुखी आणि आळस आल्यासारखे वाटते म्हणून व्यायामाच्या अगोदर भरपूर पाणी प्यायला पाहिजे.
* गर्मीत दीड-दोन तास चालणारे खेळ खेळत असाल तर दरम्यान पाणी जरूर प्यावे.
* गर्मीत प्राणायाम करणे लाभदायक असते.
* या दिवसांत समोर वाकून करावयाचे आसन केल्यानंतर मागे वाकून करायचे आसन केले पाहिजे.
* उन्हाळ्यात व्यायाम करताना वस्त्र जास्त कसलेले किंवा ढगळ नको.
* गर्मीत प्रत्येक आसनानंतर शवासन किंवा मकरासन केले पाहिजे.
* या दिवसांत प्राणायाम केल्यानंतर श्वास सामान्य झाल्यानंतरच पुढचे प्राणायाम केले पाहिजेत.
* व्यायाम करताना गर्मी होत असल्यास चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडायला पाहिजे. त्याने चांगले वाटते.
