सहलीला जाताय? ही काळजी घ्या!
|
* घराच्या बाहेर निघताना हलके जेवण करून निघा.
* प्रवासात जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ उदा. - पुरी, पराठे, समोसा, कचोरी इत्यादी टाळावे.
* जास्त चहा, कॉफी किंवा शीतपेये घेणे टाळावे.
* शिळे अन्न खाणे टाळावे.
* प्यायचे पाणी नेहमी आपल्या सोबत ठेवावे.
* ताज्या फळांचे सेवन करावे. कापलेले फळ विकत घेऊ नये.
* शीतपेयाऐवजी सीलबंद ज्यूस घ्यावा.
* काही आवश्यक औषधांच्या गोळ्या आपल्या सोबत ठेवाव्यात आणि इलेक्ट्रॉल पावडर, ग्लूकोज, पुदिनहरा, लिंबू इत्यादी आपल्या जवळ असावे.
* प्रवासात आपल्याजवळ ताजा ब्रेड, जॅम (पाऊच), बिस्किट, कुरमुरे, फुटाणे, भाजके दाणे, गुळ सारख्या वस्तू ठेवाव्या.
हे पदार्थ भूक लागल्यावर कामी पडतील आणि पोषकसुद्घा असतात.
* व्हेजिटेबल सँडविचचा उपयोग जेवताना करावा. यासाठी टोमॅटो, काकडी, लिंबू, मीठ, चाकू इत्यादी जवळ ठेवावे. जेवण एकाच वेळेस न करता थोड्या थोड्या वेळाने करावे.
