उन्हाळ्यात फळं खा!
|
प्रखर सूर्यकिरणांनी घाम येतो आणि घामामुळे शरीरात असलेले पाणी व इतर घटक बाहेर पडतात. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन झाल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि स्नायू ताणले गेल्यासारखे वाटतात. या तक्रारींपासून मुक्ती मिळवण्यासाठी फळांचे सेवन केले पाहिजे.
|
|
|
|
खरबूज - खरबूजसुद्धा खास उन्हाळ्यातील फळ आहे, यामुळे शरीराला गरजेइतके पाणी मिळते. यात व्हिटॅमिन ए, सी, लोह, सोडियम आणि पोटेशियम असते.
|
|
केळी - केळी शरीराला थंडावा देतात. शिवाय त्यात नैसर्गिक साखरही असते.
|
|
|
द्राक्ष, टरबूज, केळी, फणस अननस आणि लिंबाचा रस उन्हाळ्याच्या दिवसांत लाभदायक असतो, हे स्फूर्तिदायक आहेत शिवाय लवकर पचतात.
