कावीळ
कावीळ या विकाराला कोणतीही खास औषधे नाहीत. पूर्ण विश्रांती हेच एकमेव महत्त्वाचे औषध आहे. त्याकरता रुग्णाला कोणत्याही कारणासाठी उठू देऊ नये. पचनशक्तीलासुद्धा विश्रांतीची गरज असते. त्यादृष्टीने आहाराची निवड करावी.
कावीळ हा आजार अन्न-पाण्यातून काविळीचे जंतू जाऊन होतो. रुग्णाला भूक लागत नही. कोणतेही काम करायला उत्साह नसतो. तसेच सतत झोपावे वाटते. लघवी, डोळे यांचा रंग पिवळा होतो. पोटात लिव्हरच्या जागी दुखते. ह्या विकारात मुख्यत: लिव्हर खराब झालेली असते. आपल्या शरीराची पचनक्रिया ही मुकत्वेकरून लिव्हरवर अवलंबून असल्याने वरील लक्षणे दिसतात. या विकारात लिव्हरला विश्रांती देणे अतिशय महत्त्वाचे आहे.
म्हणून हलका आहार, थोडा-थोडा, वारंवार द्यावा. रुग्णाला िवशेष भूक नसते. म्हणून खाण्याचा आग्रह करू नये.
पनचनाला हलका आहार म्हणजे पातळभात द्यावा. लिंबाचे लोणचे थोडेसे चालेल. पण भातावर तूप नको. पापड भाजून चालेल, तळून नको. चपातीलासुद्धा तेल तूप न लावता फुलक्याप्रमाणे कोरड्या द्याव्यात. भाकरीला तूप, लोणी नको.
दूध द्यायला हरकत नाही पण सायीसकट नको. तर नुसत्या दुधाच्या दह्याचे ताक चालेल. पचनाला हलकी अशी निरनिराळ्या कडधान्यांची सूप्स चालतील. कारण प्रोटीन्स शरीराबाहेर जात असतात.
काविळीसाठी पथ्याचे पदार्थ
* पातळ भात, चपाती, भाकरी (कोरडी, तेल, तूप न लावता)
* दूध (साय नको) निरनिराळ्या कडधान्यांचे सूप प्रकार
* पालक, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मक्याची कणसे यांचे सूप, आमसुलाचे सार.
* तांदुळाच्या पिठाची, ज्वारीच्या पिठाची धिरडी, मुगाची खिचडी (मसालारहित) सर्व भाज्या घालून केलेला भात.
* फळांचे रस - ऊसाचा रस, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, आमसुलाचे सरबत, पपई, चिक्कू ही फळे.
* उसाचा रस पिण्यापेक्षा ऊस दातांनी तोडून खावा. आवश्यक ती शर्करा मिळण्याबरोबर रुग्ण खाण्यात गुंतला जातो.
| |
|