1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

स्लिम व्हायचं असेल तर स्विमिंग करा

स्लिम व्हायचं असेल तर स्विमिंग करा
ND
जर तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल तर त्यावरचा रामबाणउपाय म्हणजे तुम्ही स्विमिंग सुरू करा. हा सर्व अंगाला होणारा व्यायाम आहे. यामुळे तुम्ही बारीक तर होताच परंतु यामुळे तुमच्या मनात एक उत्साहही निर्माण होतो. पोहण्यामुळे होणारे फायदे :

* ज्या लोकांना कंबरदुखीचा त्रास होत असेल किंवा लट्ठपणाचा विकार असेल त्यांच्यासाठी पोहणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे कारण याने वजन कमी होऊन कंबरेच्या दुखण्यातसुद्धा आराम मिळतो.
* पाण्यात पोहण्याचा एक फायदा असा आहे की याने संपूर्ण शरीराच्या मांसपेशी आणि हाडांची स्वतंत्र हालचाल होते. त्याच बरोबर हाडे मजबूत होण्यासही मदत मिळते.
* पोहण्याने कोणताही अपाय होण्याची शक्यता फार क्वचितच.उन्हाळ्यात तर पोहण्याने चांगला फायदा होतो.
* पाण्यात अधिककाळ राहिल्याने तुम्हाला चांगला फायदा तर होतोच, परंतु रक्ताभिसरणही सुरळित राहत असल्याने आरोग्यही चांगले राहते.

पोहताना घ्यावयाची काळजी:
* प्रशिक्षकाशिवाय पाण्यात उतरू नका.
*जर तुम्हाला पोहता येत नसेल तर कशाचा तरी आधार घेऊन तुम्ही पाण्यात उतरा, उगीच उत्साहाच्या भरात खोल पाण्यात जाण्याचे दु:साहस करू नका.
* स्विमिंगपूर जर इंडोअर असेल तर त्यात पोहण्याची मजा काही औरच असते, कारण याचे तापमान एकसारखेच राहते.
* पोहण्याआधी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.
* प्रशिक्षकाने दिलेल्या निर्देशांचे तुम्ही नियमीतपणे पालन करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा